Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

आता मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोना संसर्ग झाल्याचं वृत्त आहे.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण
SHARES

कोरोनाच्या विळख्यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण अडकले आहेत. आता मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोना संसर्ग झाल्याचं वृत्त आहे.

मोहन जोशी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. महत्वाचं म्हणजे मोहन जोशी यांनी त्यांच्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यांनी त्यांच्या चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचं सांगून घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

सध्या मोहन जोशी 'अग्गंबाई सुनबाई' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित झाल्यावर मालिकेतील इतर कलाकारांसोबत ते देखील गोव्याला चित्रीकरणासाठी गेले होते. परंतु, गोव्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवानं सर्व मालिकांना दिलेली चित्रीकरणाची परवानगी रद्द केली. त्यानंतर संपूर्ण मालिकेची टीम मुंबईला परत आली होती. मागील वर्षी या मालिकेत महत्त्वाची भूमिका वठवणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

मोहन जोशी यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसह तामिळ, तेलुगु, कन्नड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.हेही वाचा

दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकले केदार शिंदे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा