Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकले केदार शिंदे

अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत केदार आणि बेला यांचा लग्नसोहळा पार पडला.

दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकले केदार शिंदे
SHARES

मराठी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी मोहोर उमटवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या लग्नाला ९ मे रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. या खास दिवसाचे औचित्य साधत केदार यांनी पुन्हा एकदा पत्नी बेला शेंडेसोबत लग्न थाटले आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत केदार आणि बेला यांचा लग्नसोहळा पार पडला.

२५ वर्षापुर्वी केदार आणि बेला यांचे कोर्ट मॅरेज झाले होते. त्यांच्या लग्नाला बेला यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघांना लग्नात कुठलीच हौसमौज करता आली नव्हती. मात्र २५ वर्षांनी दोघांनी तोच क्षण अनुभवायचा निर्ण घेतला.

विशेष म्हणजे २५ वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेजमुळे त्यांच्या लग्नात मोजकेच लोक उपस्थित होते आणि आता लॉकडाऊनमुळेही लग्नात मोजकेच लोक उपस्थित होते. मात्र व्हर्च्युअली अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी या लग्नाचे साक्षीदार झाले. केदार आणि बेला शेंडे यांच्या नातेवाईकांसह अभिनेता शर्मन जोशी, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, अंकुश चौधरी यांच्यासह अनेक जवळच्या मित्रांनी ऑनलाईन हा लग्नसोहळा अनुभवला.

केदार शिंदे यांच्या मावशी वसुंधरा साबळे यांनी सोशल मीडियावर केदार आणि बेला यांच्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. सोबत सगळ्यांनी हा लग्नसोहळा कसा अनुभवला तेदेखील सांगितलं आहे.


वसुंधरा साबळे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, 'आपापल्या घरी आम्ही केदारचे सर्व नातेवाईक आणि त्याची मित्रमंडळी रविवार असुनही ११ वाजताचा मुहूर्त चुकू नये म्हणुन लवकर तयारी करून बसलो होतो.. लग्नसोहळा अगदी साग्रसंगीत सुरू झाला... जे केदार आणि बेलाच्या पहिल्या लग्नात दुरवर कुठेच नव्हते त्यांनी या लग्नातल यजमानपद अत्यंत उत्साहात उचललं होत. केदार कडून Prashant Gaonkar कुटुंबीय होते तर बेलाकडून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर होते. सगळे विवाहविधी अत्यंत गंभीरपणे सुरू झाले आणि सिध्दार्थ जाधव स्क्रीनवर दिसला, तो त्याच्या घरातून ओरडून सांगत होता "सर मी तुमच्या लग्नात नाचणार आहे.." आणि तो लग्न लागताच खरंच त्याच्या घरी नाचला सुध्दा...

शर्मन जोशी सहकुटूंब सोहळा पाहात होता तो म्हणाला " यार केदार हम एकबार शादी करके पछताते हैं तुमने दुसरीबार ये डेअरींग कैसे कीया?"

सोहळ्याच्या जागी लॉकडाऊनमुळे कुणी उपस्थित नसले तरी सगळी धमाल तशीच चालू होती... पहिल्या लग्नात हिरीरीनं भाग घेतलेले भरत, अंकुश आज नाईलाजानं घरात बसून सोहळ्यात सामील झाले होते. बरेच लोक उत्साहानं शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायला ऑनलाईन हजर होते.

वाईट याच गोष्टीच वाटलं की त्यावेळी बेला घरातून पळून आल्यामुळे तिच्या कन्यादानाला मुकलेले तिचे कुटूंबीय या वेळीही लॉकडाऊनमुळे मुकलेच.. ती जबाबदारी मात्र आदेश आणि सुचित्राने मोठ्या आनंदानं पार पाडली... लग्नपत्रिकेत "स्नेहभोजन आपापल्या घरी" असं लिहिल्यामुळे मात्र लग्न लागताच आम्ही सगळेच आपापल्या घरी स्वयंपाकाला लागलो. अशा प्रकारे काल हा अनोखा विवाह सोहळा सुफळसंपुर्ण झाला...'हेही वाचा

बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांच्या मदतीस धावला सलमान खान

अभिनेता अक्षय वाघमारेच्या घरी चिमुकल्याचे आगमन, अरुण गवळी झाले आजोबा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा