Advertisement

‘वी आर प्रेग्नंट’ म्हणत परतली सुपरहिट जोडी!

पाच वर्षांपूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई’ला मिळालेल्या यशानंतर आणि दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल आला होता. सिक्वेलनंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अशाप्रकारे तिसऱ्या भागात प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा मराठीतील हा पहिलाच प्रयत्न आहे. ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या या बहुप्रतीक्षित ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

‘वी आर प्रेग्नंट’ म्हणत परतली सुपरहिट जोडी!
SHARES

‘वी आर प्रेग्नंट’ असं म्हणत स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही मराठी सिनेसृष्टीतील सध्याची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ७ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या दिग्दर्शक सतीश राजवाडेच्या ‘मुंबई पुणे मुंबई ३’ या चित्रपटात ही जोडी पुन्हा धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे.


प्रदर्शनासाठी सज्ज

पाच वर्षांपूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई’ला मिळालेल्या यशानंतर आणि दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल आला होता. सिक्वेलनंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अशाप्रकारे तिसऱ्या भागात प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा मराठीतील हा पहिलाच प्रयत्न आहे. ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या या बहुप्रतीक्षित ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील स्वप्नील व मुक्ता या जोडीनं रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडतं, त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीजर देतो.

Swapnil Joshi & Mukta Barve- MPM-3..jpg

‘मुंबई पुणे मुंबई’ पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्याने इतिहास रचला. चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपर डुपर हिट ठरला होता. दोन वर्षांपूर्वी सिक्वेलनेही यशाची पुनरावृत्ती केली. आता पुन्हा कित्ता गिरवण्यासाठी या सिनेमाची टिम आतुरली आहे. या चित्रपटाचा सिक्वेल ‘मुंबई पुणे मुंबई-२’ हा दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अमेरिकासारख्या देशांमध्येही चित्रपटाला भरपूर प्रतिसाद लाभला. या चित्रपटाचे शो सॅन फ्रॅन्सिस्को, ह्युस्टन, लॉस एंजेलिस, डेट्रॉइट, सॉल्ट लेक सिटी यांसारख्या परदेशी शहरांमध्येही झाले होते.

Mukta Barve & Swapnil Joshi- MPM-3.jpg


पुढच्या भागालाही वाव

सतीश राजवाडे याबाबत म्हणाला, ‘मुंबई पुणे मुंबई’ला एवढं यश मिळेल असं आम्हाला सुरुवातीला वाटलंच नव्हतं. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून, प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडतं आहे, त्याबद्दल प्रेक्षकांना जिज्ञासा लागलेली असते. ‘मुंबई पुणे मुंबई’चं चित्रीकरण करत असताना या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असं वाटलं नव्हतं, पण दुसऱ्या भागाचं चित्रीकरण करत असताना याच्या पुढच्या भागालाही वाव असल्याचं मात्र स्पष्टपणे जाणवलं होतं.


हेही वाचा -

स्वप्नील-मुक्ताच्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ला ७ डिसेंबरचा मुहूर्त

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा