Advertisement

चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट!


चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट!
SHARES

क्रिकेटमधला देव म्हणजेच सचिन तेंडुलकर! आपल्या लाडक्या देवाच्या वाढदिवसासाठी चाहते काहीतरी वेगळं करत असतात. त्याच्या एका डाय हार्ट फॅनने चक्क सचिनला एक चित्रपटच गिफ्ट दिला आहे. सचिन जाधव या सचिन वेड्या मुलाने आपल्या मित्रांच्या मदतीने 'तेंडल्या' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.


चित्रपटाची हटके विनोदी शैली!

“आमच्या चित्रपटातील पात्रे अज्याबात काल्पनिक नाहीत, लगेच हुडकाया जाऊ नका, कारण ते कुठं घावणार बी नाय...अख्ख्या ऑल इंडियात जिवंत आसू द्यात की मेलेलं आसू द्या...त्याच्यासंग योगा योगान नव्हं... तर ओढून ताणून आणलं तरी बी संबंध जुळणार नाय” अशा हटके विनोदी शैलीतला 'डिस्केल्मर' आणि आबालवृद्धांमध्ये खेळलं जाणारं क्रिकेट आणि क्रिकेटवरील प्रेम अतिशय अफलातून पद्धतीने चित्र स्वरुपात दाखवण्यात आलं आहे. या सर्व गोष्टीतून ‘तेंडल्या’ या सिनेमाबद्दल चित्रपट रसिकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सचिन जाधव यांनी केलं आहे. क्रिकेट, तेंडुलकर प्रेम आणि  ग्रामीण भागातील सामान्यांचे जीवन अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीने रेखाटणारा ‘तेंडल्या’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टरचे अनावरण जेष्ठ क्रीडा पत्रकार आणि समालोचक सुनंदन लेले यांच्याहस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आलं.




हेही वाचा

'सायकल'चं हटके प्रमोशन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा