Advertisement

'सायकल'चं हटके प्रमोशन


'सायकल'चं हटके प्रमोशन
SHARES

प्रत्येक निर्माता आपल्या चित्रपटाचं हटके प्रमोशन करण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी अशाच पद्धतीने हटके प्रमोशन करण्याचा प्रयत्न 'सायकल' सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी केला आहे.

वायकॉम 18 मोशन पिक्चर्स सिनेमाच्या कलाकारांसोबत आणि शहरातील काही सेलिब्रिटींसोबत एका व्हिंटेज सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीला कलाकारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारची रॅली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली.

चित्रपटाची कथा?

सायकल हा सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकलवर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्र केशवचं हृद्यस्पर्शी चित्रण आहे. एके दिवशी केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात. यामुळे निराश झालेल्या केशवला आपली सायकल नक्की मिळेल ही आशा आहे. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना त्याच्या प्रवासादरम्यान त्या चोरांचं काय झालं? त्याला त्याची सायकल परत मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहे.


रॅलीत या कलाकारांची उपस्थिती

कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी सायकल हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तसंच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका करत आहेत. तर चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकेल यात शंका नाही. या नावीन्यपूर्ण रॅलीला अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते.

प्रियदर्शन जाधव, हृषिकेश जोशी, प्रकाश कुंटे, त्याचबरोबर लोकप्रीय मराठी अभिनेते तेजश्री प्रधान, ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, सोनाली खरे, अमृता खानविलकर तसेच कलर्स मराठी परिवारातील घाडगे & सून मधील अमृता आणि अक्षय म्हणजेच भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उदगीरकर, राधा प्रेम रंगी रंगली मधील राधा म्हणजेच वीणा जगताप आणि कुंकू, टिकली आणि टॅटू राज - आदिश वैद्य आणि कामिनी - श्वेता पेंडसे यांच्याव्यतिरिक्त अनेक जण उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement