Advertisement

वयात आलेल्यांच्या लग्नाची काळजी..बाशिंग बांधायचंय!


वयात आलेल्यांच्या लग्नाची काळजी..बाशिंग बांधायचंय!
SHARES

वयात आलेल्या मुला-मुलीचं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो. विशेषतः मुलींचं लग्न हा अंमळ जास्तच महत्त्वाचा असतो. त्या अपेक्षांच्या आणि परंपरेच्या जोखडातून मुलीच्या लग्नाचं कर्तव्य पार पाडायचं असतं. ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या आगामी मराठी चित्रपटातून लग्नाच्या अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्यात आला आहे.

या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच सहाय्यक राज्यकर आयुक्त गुन्हा अन्वेषणचे चेतन भिंगारे यांच्या हस्ते संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती भानुदास व्यवहारे व दत्तात्रय मोहिते यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी भानुदास व्यवहारे यांनी सांभाळली आहे. ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ हा चित्रपट ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वैवाहिक आयुष्यातील समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन या सगळ्यांवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. विक्रम गोखले, सुरेश विश्वकर्मा, यतिन कार्येकर, सुनील गोडबोले, भक्ती चव्हाण, श्वेता खरात, सुवर्णा काळे, रितेश नगराले, राहुल पाटील, हर्षा शर्मा, अर्जुन जाधव, शंकर सूर्यवंशी हे कलाकार या चित्रपटात आहेत.



हेही वाचा

टायगर श्रॉफचं मित्रासाठी कायपन!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा