Advertisement

'राजा'तून उलगडणार प्रेमाचं ट्रायअँगल


'राजा'तून उलगडणार प्रेमाचं ट्रायअँगल
SHARES

प्रेम हा सिनेरसिकांइतकाच दिग्दर्शकांच्याही आवडीचा विषय. यामुळेच प्रेमावर आधारलेल्या सिनेमांची संख्या इतर सिनेमांच्या तुलनेत अधिक आहे. अशा सिनेमांना प्रेक्षकांचीही चांगली पसंती मिळते. आता ‘राजा’ या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने आजवर समोर न आलेले प्रेमातील नवे पैलू आपल्यासमोर येणार आहेत.


शशिकांत देशपांडे दिग्दर्शित 'राजा'

दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा’ या सिनेमाची कथा सादर केली आहे. नवोदित अभिनेता सौरदीप कुमार या सिनेमात शीर्षक भूमिकेत असून, स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे ‘राजा’द्वारे प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत.


काय आहे 'राजा'ची कथा

येत्या २५ मे रोजी ‘राजा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राजा’ या सिनेमाची कथा एका पॅाप सिंगरच्या जीवनावर आधारित आहे. नैसर्गिक आवाजाची सुरेल देणगी लाभलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचा पॉप सिंगर बनण्याचा प्रवास या सिनेमात आहे. दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा’ची कथा सादर केली आहे.

राजाच्या जीवनात येणाऱ्या दोन्ही नायिका त्याला त्याच्या प्रवासात यथोचित साथ देतात. यापैकी एक असते राधा, तर दुसरी मीरा. यानिमित्ताने जणू आधुनिक युगातील राधा-मीराची प्रेमकथाही समोर येणार आहे. गायक बनण्यासाठी स्ट्रगल करणारा राजा नेमका कोणावर प्रेम करत असतो? ते सिनेमा पाहिल्यावरच समजेल.


हेच सिनेमाचं यश

उत्कंठावर्धक कथानक ही या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचं दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांचं म्हणणं आहे. राजाच्या जीवनात येणारे चढ-उतार प्रेक्षकांना त्यांच्या जीवनातील स्ट्रगलशी जोडण्यात यशस्वी होतील आणि हेच या सिनेमाचं सर्वात मोठं यश असेल, असं देशपांडे यांचं म्हणणं आहे.

नवोदित अभिनेता सौरदीप कुमार स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे याखेरीज शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, राजेश भोसले, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, मिलिंद इनामदार, पौरस आदी कलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा