SHARE

खेळावर आधारित सिनेमांना प्रेक्षकही भरभरून पसंती देतात. आता खेळावर आधारित आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टेबलटेनिस खेळावर आधारित असलेला ‘बेधडक’ या सिनेमात अभिनेत्री नम्रता गायकवाड मुख्य भूमिकेत आहे.


नम्रता टेबल टेनिसपटूच्या भूमिकेत

या सिनेमात नम्रता टेबल टेनिसपटूच्या भूमिकेत आहे. याआधी नम्रता कॅम्पस कट्टा, वंशवेल, विजय असो, लंगर, स्वराज्य या चित्रपटात झळकली होती. आता बेधडकमधून नम्रताचा वेगळा लूक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी नम्रताने खूप मेहनत घेतली आहे. खेळाडू प्रमाणे फिट राहण्यासाठी तिने फिटनेसवर भर दिला आहे. त्यामुळे नम्रताची ही भूमिका नक्कीच वेगळी आणि खास ठरणार आहे.


सिनेमाचं शूटिंग संपलं

या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले असून सध्या प्रोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. याआधी खेळावर आधारित 'इक्बाल’, 'दंगल’, 'चक दे इंडिया’, 'मेरी कॉम’, 'सुलतान' या चित्रपटांबरोबर ‘बेधडक’ हा सिनेमाही प्रेक्षक डोक्यावर घेतील यात शंका नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या