Advertisement

आता चित्रपटगृहांमध्ये मिळणार 'व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’

माथेरानमधल्या शाळेत शिकणारी मुलगी आणि त्याच शाळेच्या आवारात राहणारी ‘व्हॅनिला’, या दोघींच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. ‘व्हॅनिला’ आणि तेजू यांच्या सुरेख नात्याची गुंफण दाखवतानाच मुक्या जीवांच्या रक्षणाचा मुद्दा हा चित्रपट अधोरेखित करतो.

आता चित्रपटगृहांमध्ये मिळणार 'व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’
SHARES

चित्रपटगृहांमध्ये विकल्या जाणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांचा मुद्दा अद्याप निकाली नसताना १६ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये 'व्हॅनिला, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट’ मिळणार असल्याची बातमी आहे. होय, या दिवशी 'व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


वेगळीच प्रेमकथा

शीर्षकाप्रमाणेच या चित्रपटातही एक वेगळीच प्रेमकथा पहायला मिळणार आहे. पसायदानात एक ओळ आहे, ‘भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे’... हे दोन जीवांचे मैत्र... मग ते दोन जीव म्हणजे दोन माणसं असतील किंवा माणूस आणि प्राणी असेल.... वेगवेगळ्या प्राण्यांना घेऊन बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये वेगवेगळे चित्रपट केले जातात मात्र मराठी चित्रपटसृष्टीत असे चित्रपट पहायला मिळणं तसं दुर्मिळच. मात्र आता प्राणीप्रेमावर आधारलेला ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत  आहे.


सुरेख नात्याची गुंफण 

निसर्गरम्य माथेरानमध्ये पर्यटकांना घोड्यावरून सैर घडवून आणणारे बाबू पवार त्यांची पत्नी, मुलगा चिनू, मुलगी तेजू यांच्या चौकोनी कुटुंबात ‘व्हॅनिला’चं आगमन होतं. या कुटुंबाची ‘व्हॅनिला’ सोबतच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटात आहे. माथेरानमधल्या शाळेत शिकणारी मुलगी आणि त्याच शाळेच्या आवारात राहणारी ‘व्हॅनिला’, या दोघींच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. ‘व्हॅनिला’ आणि तेजू यांच्या सुरेख नात्याची गुंफण दाखवतानाच मुक्या जीवांच्या रक्षणाचा मुद्दा हा चित्रपट अधोरेखित करतो. चित्रपट माध्यमातून हा मुद्दा ठळकपणे समाजापुढे येईल या उद्देशाने या चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचं दिग्दर्शक गिरीश विश्वनाथ सांगतात.  


आव्हानात्मक चित्रीकरण

माथेरानसारख्या नयनरम्य ठिकाणी संपूर्णपणे चित्रीत झालेला ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा पहिलाच चित्रपट आहे. माथेरानची भौगोलिक परिस्थिती सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी कोणतेही वाहन नेण्यास मज्जाव आहे त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण हे संपूर्ण टीमसाठी आव्हानात्मक होतं. चित्रीकरणाच्यावेळी व्हॅनिटी व्हॅन तर सोडाच, पण चित्रीकरणस्थळी जाण्यासाठीही कलाकार व तंत्रज्ञांना पायी चालत जावे लागायचे, तरीही हे आव्हान टीमने पेललं आणि यशस्वीरित्या चित्रीकरण पूर्ण केलं.


जानकी पाठकचं पदार्पण 

या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक गिरीश विश्वनाथ आणि त्यांची लेक अभिनेत्री जानकी पाठक चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमाची निर्मिती गिरीश विश्वनाथ यांची आहे. कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नवोदित अभिनेत्री जानकी पाठक, रवी काळे, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.



हेही वाचा - 

शाहरूखचा 'झीरो' वादात; किरपानचं दृश्य हटवण्याची चरणसिंग सप्रांची मागणी

अमृताचा दिवाळी लुक पाहिला का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा