Advertisement

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं निधन

गिरिजा कीर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मुंबईत वांद्रेमधल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं निधन
SHARES

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं गुरुवारी संध्याकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. गिरिजा कीर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मुंबईतल्या वांद्रेमधल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे

गिरिजा कीर यांचं साहित्यात मोठं योगदान होतं. कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णनं अशा साहित्यप्रकारांत त्यांचं मोठं योगदान आहे. अनुराधा मासिकाच्या सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केलं. कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासींचं जीवन त्यांनी जवळून अनुभवलं. गिरिजा कीर यांचं 'जन्मठेप' हे पुस्तक त्यांनी 6 वर्षं येरवडा तुरुंगात जन्मठेप झालेल्या कैद्यांवर संशोधन करून लिहिलं आहे.

गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, झपाटलेला अशा लोकप्रिय कादंबऱ्या त्यांनी लिहल्या आहेत. तर गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास अशी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकं त्यांनी लिहली आहे. 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा