Advertisement

ह्ये 'इपितर' लैच येडे भो!


ह्ये 'इपितर' लैच येडे भो!
SHARES

साधी माणसं, ग्रामीण बाजाची भाषा आणि सशक्त कथानक हा मराठी सिनेमाचा गाभा मानला जातो. असाच एक सिनेमा जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं नाव आहे 'इपितर'. सिनेमाचं फर्स्ट लुक पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.


हे कलाकार आहेत मुख्य भूूमिकेत

नितीन कोल्हापूरे आणि किरण बेरड निर्मित या चित्रपटात भारत गणेशपुरे, मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, जयेश चव्हाण, विजय गीते, गणेश खाडे, निकिता सुखदेव, वृंदा बाळ यांच्या मुख्य भूमिका आहेत.


इपितर हा टिपिकल गावाकडचा शब्द आहे. इरसाल, बिलंदर ह्या अर्थाने त्याचा वापर केला जातो. अशाच तीन इरसाल मुलांची कथा तुम्हाला इपितर सिनेमातून दिसणार आहे. विनोदी ढंगाने जाताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्नही आम्ही केला आहे.

किरण बेरड, लेखक-निर्माते


इपितर 8 जून 2018 ला चित्रपटगृहात येणार आहे.हेही वाचा

अवधूत गुप्तेचं ‘मंकी बात’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण


संबंधित विषय
Advertisement