Advertisement

अवधूत गुप्तेचं ‘मंकी बात’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण


अवधूत गुप्तेचं ‘मंकी बात’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण
SHARES

ख्यातनाम गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते हे नाव सर्वांनाच परिचयाचं आहे. पारंपरिक संगीताला आधुनिक संगीताची जोड देऊन त्यांनी बनवलेली अनेक गाणी महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. संगीतक्षेत्रात एक वेगळं वलय निर्माण केल्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनातही स्वतंत्र ठसा उमटवला. असा हा अष्टपैलू कलाकार निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित ‘मंकी बात’या धमाल बालचित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहेत.


काय म्हणाले अवधूत

'पहिला म्युझिक अल्बम केल्यानंतर मला अनेक दिग्दर्शकांनी अभिनय करण्याविषयी विचारले होते, मात्र मी तो आपला प्रांत नाही, असं सांगत त्यांना टाळले होते. ‘मंकी बात’चे दिग्दर्शक विजू माने हे माझे जवळचे मित्र. त्यांनी मला जेव्हा अभिनयासंबंधी विचारणा केली असता, मी नेहमीप्रमाणेच टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर जेव्हा त्यांनी मला कथा ऐकवली तेव्हा मी क्षणार्धात होकार दिला', असं ‘मंकी बात’ या चित्रपटाबद्दल बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले.  

'अभिनेता म्हणून हा माझा पहिला चित्रपट तर आहेच, पण मी जी भूमिका साकारली ती नक्कीच सर्वांसाठी सरप्राईझ असणार आहे. नेहमीपेक्षा काही वेगळं करण्याचा माझा स्वभाव चित्रपटातही दिसेल याची काळजी दिग्दर्शक विजू माने यांनी घेतल्याचंही अवधूत गुप्तेने नमूद केलं'.
हा धमाल विनोदी बालचित्रपट येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा