सुभाष घईंच्या 'विजेता'चा प्रवास सुरू

हिंदी चित्रपटसृष्टीत शो मॅन अशी ओळख असणाऱ्या निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांना पुन्हा एकदा मराठी सिनेमानं मोहिनी घातली आहे. घईंची चौथी मराठी निर्मिती असलेल्या 'विजेता' या आगामी मराठी चित्रपटाचा प्रवास सुरू झाला आहे.

  • सुभाष घईंच्या 'विजेता'चा प्रवास सुरू
SHARE

हिंदी चित्रपटसृष्टीत शो मॅन अशी ओळख असणाऱ्या निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांना पुन्हा एकदा मराठी सिनेमानं मोहिनी घातली आहे. घईंची चौथी मराठी निर्मिती असलेल्या 'विजेता' या आगामी मराठी चित्रपटाचा प्रवास सुरू झाला आहे.


विदेशातून आॅफर्स 

मराठी चित्रपटांनी जगभरातील फिल्ममेकर्सच लक्ष वेधून घेतलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळंच एकीकडं मराठी कलाकारांना देश-विदेशातील चित्रपटांमध्ये आॅफर्स येत आहेत, तर दुसरीकडं चक्क हिंदीतील दिग्गज मराठी चित्रपट निर्मितीत उतरत आहेत. यापूर्वी 'सनई चौघडे', 'वळू' आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'समितां या तीन मराठी चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर सुभाष घई त्यांच्या मुक्ता आर्टस लि.च्या बॅनरखाली 'विजेता' या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती सुरू करण्यात आली आहे.


टीझर पोस्टर लाँच

काही दिवसांपूर्वीच गोव्यात पार पडलेल्या इफ्फीमध्ये घईंच्या 'विजेता'चं पहिलं टीझर पोस्टर लाँच करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच या चित्रपटाबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. अखेर आता यावरून पडदा उठला आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे. मुहूर्ताचा क्लॅप सुभाष घई यांनी दिला व या चित्रपटाच्या सर्व कलावंत आणि टिमला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांची टीम उपस्थित होती. हा चित्रपट खेळाची पार्श्वभूमी असलेला असल्याचं पोस्टरवरूनच समजतं. २४ जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार आहे.


 रोहन-रोहनचं संगीत

या चित्रपटाचं लेखन अमोल शेटगे यांनी केलं असून, दिग्दर्शनही तेच करणार आहेत. या चित्रपटात सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके, मानसी कुलकर्णी, देवेंद्र चौगुले, तन्वी किशोर, क्रुतिका तुळसकर, प्रीतम कानगे, दिप्ती धोत्रे, गौरीश शिपुरकर, ललित सावंत आदी कलावंत अभिनय करणार आहेत. राहुल पुरी या चित्रपटाचे निर्माते असून, सहनिर्माते सुरेश पै आहेत. रोहन-रोहन ही संगीतकारांची जोडी या चित्रपटातील गीतांना संगीत देणार असून, छायांकन उदयसिंह मोहिते करणार आहेत. संकलनाची बाजू आशिष म्हात्रे सांभाळणार आहेत.हेही वाचा -

स्टेशन मास्टरच्या रूपात सलमान खान

सावधान! 'निम्मा शिम्मा राक्षस' आलाय
संबंधित विषय
ताज्या बातम्या