Advertisement

महाराजांच्या जीवनावर आधारीत पहिला अॅनिमेशनपट!


महाराजांच्या जीवनावर आधारीत पहिला अॅनिमेशनपट!
SHARES

प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असलेले एकच नाव म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराज यांचा इतिहास आज प्रत्येकालाच तोंडपाठ आहे. महाराजांचा हा इतिहास पोवाडे आणि चरित्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला आहे. आजपर्यंत महाराजांच्या इतिहासावर अनेक चित्रपट आले. मात्र, या नवीन पिढीपर्यंत हा इतिहास पोहचावा याकरीता एक नवीन प्रयोग करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी शिवाजी महाराज आता अॅनिमेशन रूपात दिसणार आहेत.

'प्रभो शिवाजी राजा' हा पहिला मराठी अॅनिमेशनपट शिवाजी महाराजांवर आधारीत आहे. गणराज असोसिएट्स प्रस्तुत, तसेच इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मेफॅक निर्मित हा अॅनिमेशनपट निलेश मुळे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर या अजरामर इतिहासाचे लेखन समीर मुळे यांनी केले आहे. तर ख्यातनाम चित्रकार सदाशिव भाऊ साठे यांनी या सिनेमातील पात्र रेखाटली आहेत. या चित्रपटाला शंकर महादेवन, नंदेश उमप, स्वप्नील बांदोडकर, श्रीरंग भावे यांचा आवाज लाभला आहे. तर संगीतकार भरत बलवल्ली यांनी या चित्रपटाचे संगीत केले आहे.


१०० मिनिटांचा अॅनिमेशनपट!

येत्या १२ जानेवारीला प्रभो शिवाजी राजे हा १०० मिनिटांचा अॅनिमेशनपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केवळ मराठी भाषाच नाही, तर हिंदी आणि इंग्रजी भाषेत देखील हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लाँच करण्यात आले.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा