देवाच्या मदतीला मनसे ...!

मल्टिप्लेक्स थिएटरमधले पाचही स्क्रिन बळकावणाऱ्यांचा मुजोरपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात मराठी सिनेमाला स्क्रिन मिळणारच, असं सांगतानाच 'देवा' आणि 'गच्ची'ला स्क्रिन न दिल्यास थिएटरमध्येच खळ्ळखट्याक होईल, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं दिला.