Advertisement

दुबईत रंगला ‘भय’चा शानदार प्रिमिअर


दुबईत रंगला ‘भय’चा शानदार प्रिमिअर
SHARES

हिंदी चित्रपटांप्रमाणेच आता मराठी चित्रपटांचे प्रमियिम देखील परदेशात होऊ लागले आहेत. नुकताच 'भय' या मराठी चित्रपटाचा शानदार प्रिमियर सोहळा दुबईमध्ये पार पडला. या सोहळ्याला दुबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा चित्रपट २ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

दुबईच्या रॉक्सी थिएटरमध्ये संपन्न झालेल्या या शोला तिथल्या स्थानिक कलाकारांनीसुद्धा आवर्जून हजेरी लावली होती. 5जी इंटरनॅशनलची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सचिन कटारनवरे यांनी केली आहे. तर दिग्दर्शन आणि संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.


काय आहे चित्रपटाची कथा?

भीती काल्पनिक असली तरी, त्या अनुषंगाने उलटसुलट विचार आपल्या मनात घोळत राहतात. त्यामुळे आपण कायम भीतीच्या दहशतीखाली येतो. ही भीती भविष्याशीच निगडीत असल्याने, काहीतरी अघटित घडणार असं बऱ्याचदा वाटत राहातं. हा आपल्या कल्पनाशक्तीचा खेळ वेळीच सावरला नाही, तर काय होऊ शकतं हे दाखवून देणारा चित्रपट म्हणजे ‘भय’.


चित्रपटात यांची भूमिका

या चित्रपटात अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, नुपूर दुधवडकर, धनंजय मांद्रेकर इत्यादी कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना पहायला मिळतील.



हेही वाचा

कॉमेडीचा करपलेला तडका...लूज कंट्रोल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा