महाराष्ट्रभर गाजतोय बबन

ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमातील नायकाचा संघर्ष, आणि त्याची महत्वाकांक्षीवृत्ती प्रेक्षकांना भावली असल्यामुळे, सिनेमातील हा 'बबन' सर्वसामान्य प्रेक्षकांना आपलासा वाटत आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेला 'बबन' या सिनेमा अल्पावधीतच सुपरहिट ठरलेला आहे.

  • महाराष्ट्रभर गाजतोय बबन
SHARE

भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमातील नायकाचा संघर्ष आणि त्याची महत्वाकांक्षी वृत्ती प्रेक्षकांना चांगलीच भावली असल्यामुळे, सिनेमातील हा 'बबन' सर्वसामान्य प्रेक्षकांना आपलासा वाटत  आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला 'बबन' हा सिनेमा अल्पावधीतच सुपरहिट ठरला आहे.राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा 'ख्वाडा'च्या घवघवीत यशानंतर भाऊरावांनी बबन हा सिनेमा दिग्दर्शित केला. ख्वाडा ला मिळालेल्या यशानंतर आता 'बबन'ला ही ते यश लवकरच मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'ख्वाडा'चा रांगडा अभिनेता भाऊसाहेब शिंदेच्या नैसर्गिक अभिनयामुळे 'बबन'च्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आला आहे. शिवाय गायत्री जाधव तसेच सिनेमातील इतर कलाकारांची भूमिका देखील वाखाणण्याजोगी आहे.

शो ची संख्या वाढवली...
अल्पावधीतच लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभलेल्या 'बबन'ला मोठी मागणी मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात या सिनेमाचे शो २०० हून २४० करण्यात आले आहेत. त्यामुळे खास प्रेक्षकांसाठी महाराष्ट्राच्या सिनेमागृहात 'बबन'चे ४०० हून ५०० शो वाढवण्यात आले आहेत. मुंबई बाहेरील सिनेमागृहात 'बबन' सिनेमाच्या तिकीट खिडकीवर हाऊसफुलची पाटी झळकताना दिसून येत असून, या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ३.२५ करोडचा गल्लादेखील सिनेमाने कमावला आहे.हेही वाचा

सैराटलेला 'बबन'!


संबंधित विषय
ताज्या बातम्या