Advertisement

'ख्वाडा'नंतर भाऊराव कऱ्हाडांचा 'बबन'


'ख्वाडा'नंतर भाऊराव कऱ्हाडांचा 'बबन'
SHARES

राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'ख्वाडा'चे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे लिखित आणि दिग्दर्शित 'बबन' या आगामी सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. येत्या २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील गाण्यांनी यापूर्वीच सिनेरसिकांना मोहिनी घातली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरला देखील सिनेरसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


नवोदित अभिनेत्री गायत्रीला संधी

'ख्वाडा' सिनेमातून नावारूपास आलेला अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका आहे. त्याच्या सोबतीला गायत्री जाधव ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये भाऊसाहेब गावाकडच्या युवकाच्या भूमिकेत जरी असला, तरी 'ख्वाडा'च्या व्यक्तीरेखेहून अगदी वेगळी भूमिका त्याने साकारली आहे.




या ट्रेलरमध्ये प्रेम आणि संघर्ष अशा दोन्ही बाजू दिसून येतात. ग्रामीण जीवनातील संघर्ष आणि कुरघोड्यादेखील या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे, हा सिनेमा प्रेमाच्या गुलाबी थंडीबरोबरच वास्तविक जीवनातील दाह लोकांसमोर घेऊन येत असल्याचे या ट्रेलरमध्ये दिसून येते.



हेही वाचा

टायगर श्रॉफचं मित्रासाठी कायपन!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा