Advertisement

नटखट भूमिकेत दिसणार सुबोध भावेचा कान्हा

अभिनेता सुबोध भावेचा मुलगा कान्हाही वडिलांच्या वाटेने जात अभिनयाकडे वळला आहे. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘माझा अगडबम’ या चित्रपटात कान्हा काहीशा नटखट भूमिकेत दिसणार आहे.

नटखट भूमिकेत दिसणार सुबोध भावेचा कान्हा
SHARES

काही कलाकारांची मुलं आपल्या आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय किंवा दिग्दर्शनाकडे वळतात आणि त्यांच्याप्रमाणेच नावलौकिकही मिळवण्यात यशस्वी होतात. अभिनेता सुबोध भावेचा मुलगा कान्हाही वडिलांच्या वाटेने जात अभिनयाकडे वळला आहे.


कान्हा नटखट भूमिकेत

आजवर बऱ्याच कलाकारांची मुलं आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाकडे वळली आहेत. लक्ष्मीकांत-प्रिया बेर्डेंचा मुलगा अभिनय, सतिश राजवाडेचा मुलगा हृदित्य, संजय नार्वेकरचा मुलगा आर्यन अशा कलाकारांच्या मुलांची खूप मोठी यादी आहे. यात आता सुबोध भावेचा मुलगा कान्हाचाही समावेश झाला आहे. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘माझा अगडबम’ या चित्रपटात कान्हा काहीशा नटखट भूमिकेत दिसणार आहे.


कान्हाचा पहिला चित्रपट

कान्हाचा पहिला वहिला चित्रपट असलेल्या ‘माझा अगडबम’मध्ये सुबोध मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे पदार्पणाच्या चित्रपटातच वडील आणि मुलाची हि जोडी प्रथमच प्रेक्षकांना ऑनस्क्रिन पाहायला मिळणार आहे. जरी हे पिता-पुत्र या चित्रपटात एकत्र झळकणार असले तरी कान्हाने सुबोधच्या मुलाची भूमिका साकारलेली नाही. कान्हाने या चित्रपटात शाळेचा तिटकारा असलेल्या, पण मोबाईल आणि डिजीटलमध्ये प्रचंड हुषार असलेल्या लहानग्या मुलाची चुणुकदार भूमिका साकारली आहे.


'या' कलाकारांच्या भूमिका

उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर, तानाजी गालगुंडे, डॉ. विलास उजवणे आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळलेल्या तृप्तीने यात नाजुकाची मुख्य भूमिकाही साकारली आहे. ‘अगडबम’ या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या या चित्रपटाची निर्मिती तृप्तीसह टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांनी केली आहे. रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.


हेही वाचा - 

‘एक सांगायचंय’मधून शुभवी लोकेश गुप्तेचं चित्रपटसृष्टीत पदार्पण!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा