
मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषयावर सिनेमे बनत असतात. जगभरातील सिनेप्रेमींना हेच विषय आकर्षित करतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचा डंका वाजतो. अशाच एका वेगळ्या विषयावर आधारित असलेला ‘तत्ताड’ हा सिनेमा लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.
‘तत्ताड’ या शीर्षकावरून बहुधा सिनेमाचा विषय लक्षात येणं कठीण आहे. त्यामुळेच थेट टीझर लाँच करून या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. राहुल ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित 'तत्ताड' या आगामी चित्रपटाचं टीझर नुकतंच पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. लक्षवेधून घेणाऱ्या ‘तत्ताड’च्या पोस्टरवरून यात एका वादकाची कथा पाहायला मिळणार असल्याचं लक्षात येतं.
चित्रपटाच्या टीझर पोस्टरमध्ये गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर हाती क्लॅरोनेट असलेला वादक पहायला मिळतो. त्यामुळे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी वादक असण्याची शक्यता आहे. चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. मात्र, लक्षवेधी पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चंद्रभागा प्रॉडक्शन्स आणि डीके फिल्म्स एंटरटेन्मेंटच्या जीवन जाधव, प्रितम म्हेत्रे आणि डीके चेतन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रोहित नागभिडे, ऐश्वर्य मालगावे यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन, तर संजय नवगिरे, राहुल बेलापूरकर यांनी गीतलेखन केलं आहे.
हेही वाचा -
