Advertisement

मोठ्या पडद्यावर लवकरच होणार 'शिमगा'!


मोठ्या पडद्यावर लवकरच होणार 'शिमगा'!
SHARES

फाल्गुन महिन्यात येणारी होळी म्हटली, की डोळ्यांसमोर येते ती शिमग्याची पालखी! सध्या अवघं कोकण शिमग्याच्या उत्साहात रंगलं आहे. प्रत्येक कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा हा 'शिमगा' लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.


'शिमगा'चा पोस्टर टीझर लाँच

श्री केळमाई भवानी प्रोडक्शन्स निर्मित 'शिमगा' या आगामी चित्रपटात कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाचा समृद्ध अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. निलेश कृष्णा दिग्दर्शित आणि लिखित या सिनेमाचा, होळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला. सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आलेल्या या टीझरमध्ये आणि पोस्टरवर सैनिकी पोशाखातले राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान हे दोन प्रमुख अभिनेते पाहायला मिळत आहेत.

या सिनेमाला पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून, गीतलेखन गुरू ठाकूर आणि वलय यांनी केलं आहे. 'शिमगा' या सिनेमाच्या नावावरूनच हा सिनेमा कोकणी संस्कृतीवर आधारित असल्याचे बोलले जात आहे.



हेही वाचा

उमेश कामत आणि तेजश्री प्रधान म्हणतात 'यू नो व्हॉट'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा