Coronavirus cases in Maharashtra: 312Mumbai: 151Pune: 35Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan-Dombivali: 9Thane: 9Navi Mumbai: 8Ahmednagar: 8Vasai-Virar: 6Yavatmal: 4Buldhana: 3Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

सई-अमेयच्या 'गर्लफ्रेंड'चा टीझर

टीझरच्या अखेरीस अमेय आणि सई पावसात स्तब्ध थांबत एकमेकांकडे बघत मिश्कीलपणं हसताना दिसतात. आता या हास्याचं रहस्य काय हे २६ जुलैला चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

सई-अमेयच्या 'गर्लफ्रेंड'चा टीझर
SHARE

मागील काही दिवसांपासून अभिनेता अमेय वाघ 'गर्लफ्रेंड' या आगामी चित्रपटामुळं चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर त्याची गर्लफ्रेंड बनली आहे. या दोघांच्या 'गर्लफ्रेंड'चा टीझर पाहिला का?


टीझर प्रदर्शित

'गर्लफ्रेंड' मिळायला हवी राव! असं म्हणणाऱ्या नचिकेत प्रधान अर्थात अमेय वाघला त्याच्या आगामी 'गर्लफ्रेंड' या चित्रपटात अलिशा नावाची मुलगी भेटल्याचं चित्रपटाच्या पोस्टर आणि टीजरमधून दिसतं. मात्र तीच त्याची 'गर्लफ्रेंड' होणार का? याची उत्कंठा वाढवणारा चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये नचिकेत सिंगल असून, त्याचा वाढदिवस १४ फेब्रुवारी म्हणजेच 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवशी असल्याचं दिसतं. 'गर्लफ्रेंड' नसणं आणि 'व्हेलेंटाईन डे'ला बर्थडे असणं याचं दुःख नेमकं काय असतं हे एक सिंगल मुलगाच सांगू शकतो हे यातून दिसतं.


सई-अमेयची केमिस्ट्री

'गर्लफ्रेंड'च्या टीजरमध्ये अमेय आपल्या कुटुंबाबरोबर १४ फेब्रुवारीला वाढदिवस साजरा करताना दिसतो. मुळात वाढदिवशी आनंदी होण्यापेक्षा आपलं वय वाढत आहे आणि आपण अजूनही सिंगल आहोत, याचं शल्य त्याच्या मनात असतं. त्यात कुटुंब, मित्र, ऑफिसमधील सहकारी आणि बॉसबरोबर असणारी त्याची केमेस्ट्री देखील इंटरेस्टिंग पद्धतीनं समोर येते. या टीझरमध्ये सई अमेयला समजून घेण्याचा प्रयत्न करत 'तुला कधीच गर्लफ्रेंड नव्हती?' असा प्रश्न विचारते. यामुळं अमेय मधील सिंगल तरुण अधिक भावूक होऊन मुलींना माझ्यासारखे 'गुड बॉईज' का आवडत नाहीत याचा पाढा वाचून तिला दाखवतो. यामुळं सई आणि अमेयमध्ये नक्क्की काय केमिस्ट्री या चित्रपटात जुळलेली असणार याबाबतची उत्कंठा वाढते.


२६ जुलैला प्रदर्शित 

या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केलं असून, निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. यात अमेय आणि सई यांच्यासह सागर देशमुख, इशा केसकर, रसिका सुनील, सुयोग गोऱ्हे, यतीन कार्येकर, कविता लाड, उदय नेने अशी स्टारकास्ट आहे. टीझरच्या अखेरीस अमेय आणि सई पावसात स्तब्ध थांबत एकमेकांकडे बघत मिश्कीलपणं हसताना दिसतात. आता या हास्याचं रहस्य काय हे २६ जुलैला चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

लिंक - https://www.youtube.com/watch?v=gtMG_5_VepEहेही वाचा -

बालीनं पाहिला विद्याचा हॅाट अंदाज!

श्रद्धाचा 'साहो' अंदाज पाहिला का?
संबंधित विषय
ताज्या बातम्या