Coronavirus cases in Maharashtra: 194Mumbai: 77Islampur Sangli: 25Pune: 20Pimpri Chinchwad: 12Nagpur: 12Kalyan: 7Navi Mumbai: 6Thane: 5Yavatmal: 4Vasai-Virar: 4Ahmednagar: 3Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Palghar: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 6Total Discharged: 28BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

अण्णाची धमाल दाखवत आला 'ये रे ये रे पैसा २'चा टीजर

'अण्णा परत येतोय', अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या 'ये रे ये रे पैसा २' या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. अमेय खोपकर निर्मित या बिगबजेट चित्रपटाचं जवळपास ९० टक्के चित्रीकरण लंडनमध्ये झालं आहे.

अण्णाची धमाल दाखवत आला 'ये रे ये रे पैसा २'चा टीजर
SHARE

'अण्णा परत येतोय', अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या 'ये रे ये रे पैसा २' या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. अमेय खोपकर निर्मित या बिगबजेट चित्रपटाचं जवळपास ९० टक्के चित्रीकरण लंडनमध्ये झालं आहे. 


बॉक्स ऑफिसवर धमाल

अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज ची निर्मिती असलेल्या 'ये रे ये रे पैसा २' या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं आहे. 'ये रे ये रे पैसा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. खिळवून ठेवणारं कथानक, दमदार विनोद, उत्तम स्टारकास्टमुळं या चित्रपटाला प्रेक्षकांना डोक्यावर घेतलं होतं. आता लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमेनं या चित्रपटाला 'ये रे ये रे पैसा २'च्या रुपात पुढे नेलं आहे.


९ ऑगस्टला प्रदर्शित 

संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर असे मराठीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात आहेत. टीजरमधून या चित्रपटात वेगवान कथानक पहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे. अण्णा परत आल्यानं आता काय धमाल उडणार याचं उत्तर चित्रपटातच मिळेल. ९ ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Teaser link - https://youtu.be/02L_1Tba27Yहेही वाचा- 

केव्हीआर ग्रुपमधील मतभेद संपता संपेना !
संबंधित विषय
ताज्या बातम्या