Advertisement

अमेयला 'गर्लफ्रेंड' पटेल का?

मराठमोळा अभिनेता अमेय वाघ सध्या 'गर्लफ्रेंड' पटवण्याच्या प्रयत्नात आहे. अमेय यात यशस्वी होईल का? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांनाही सतावत आहे.

अमेयला 'गर्लफ्रेंड' पटेल का?
SHARES

सध्याचे काही कलाकार सोशल मीडियाचा अत्यंत हुषारीनं वापर करताना दिसतात. मराठमोळा अभिनेता अमेय वाघही यात तरबेज आहे. सध्या 'गर्लफ्रेंड' पटवण्याच्या प्रयत्नात असलेला अमेय यात यशस्वी होईल का? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत आहे.


अमेयचं एकमेव ध्येय 

'कोण बनणार अमेयची गर्लफ्रेंड' अशा आशयाची बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच दिली होती. अमेयला सध्या गर्लफ्रेंडनं जणू मोहिनीच घातली आहे. काही दिवसांपूर्वी तर तो सोशल मीडियावर गर्लफ्रेंडसाठी नाव सुचवा, असं म्हणत असल्याचं आपण पाहिलं आहे. आता तो गर्लफ्रेंड पटवण्याच्या फॅार्म्युल्याच्या शोधात आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे गर्लफ्रेंड पटवायची हेच आज अमेयचं एकमेव ध्येय आहे. अमेयचा तसा व्हिडीओही समोर आला आहे.


मी 'गर्लफ्रेंड' पटवणार

कॉलेजला जाणाऱ्या प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की, आपलीही एक गर्लफ्रेंड असावी. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणं ही गोष्ट अलीकडं अतिशय कॉमन बाब झाली आहे. मात्र एखाद्याला गर्लफ्रेंड नसेल तर त्याची त्याच्या ग्रुपमध्ये खिल्ली उडवली जाते किंवा तो मुलगा अनेकदा काहीसा निराश झालेला दिसतो. अशीच काहीशी अवस्था 'गर्लफ्रेंड' या आगामी चित्रपटात अमेयनं साकारलेल्या नचिकेत प्रधानची झालेली पहायला मिळणार आहे. त्यामुळेच अमेयनं 'मी 'गर्लफ्रेंड' पटवणार', असा जणू जपच सुरू केला आहे.


टीजर प्रदर्शित 

'गर्लफ्रेंड' या चित्रपटात लेखक-दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांनी आजच्या काळातील एका मुलाची कथा मांडली आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता 'गर्लफ्रेंड'चा टीजर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. जरा मदत हवीय तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज!, त्यानंतर दम असेल तर गर्लफ्रेंडचं नाव सांगा! अशी पोस्ट अमेयनं चित्रपटासाठी केल्याचं उघड झाल्यावर त्याची गर्लफ्रेंड कोण? असा विषय चर्चिला जात असतानाच नचिकेताला कुठे एखादं कपल दिसलं, तर याच्या अंगी निराशेची लहर संचारते. 


गर्लफ्रेंडच्या भूमिकेत कोण?

या निराशेच्या लहरीतूनच 'गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार', असं म्हणत 'मी गर्लफ्रेंड पटवणार' हा दृढनिश्चय नचिकेतनं केल्याचं टीजरमध्ये दिसतं. आता खरोखर अमेय म्हणजेच नचिकेत प्रधानला गर्लफ्रेंड मिळणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. 'गर्लफ्रेंड' या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. या चित्रपटात अमेयच्या 'गर्लफ्रेंड'च्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार या प्रश्नाचं उत्तरही अद्याप मिळालेलं नाही. त्यामुळं त्याचीही उत्सुकता आहे.

लिंक  - https://www.youtube.com/watch?v=VQcnbuPOSeo



हेही वाचा  -

सयाजीसोबत नवोदित पूजाचा 'तांडव'

मराठीसाठी पंजाबी गुरबिंदर सिंगची उर्दू कव्वाली !




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा