Advertisement

कप साँग गर्ल मिथिला पालकर 'फोर्ब्स'मध्ये!

'मुरांबा' फेम मिथिला पालकर हिचं नाव थेट 'फोर्ब्स इंडिया'च्या मासिकामध्ये झळकलं आहे. 'फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी'मध्ये आशिया खंडातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या युवकांपैकी 'आश्वासक ३०' या यादीमध्ये मिथिलाचा समावेश करण्यात आहे.

कप साँग गर्ल मिथिला पालकर 'फोर्ब्स'मध्ये!
SHARES

'मुरांबा' फेम मिथिला पालकर हिचं नाव थेट 'फोर्ब्स इंडिया'च्या मासिकामध्ये झळकलं आहे. 'फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी'मध्ये आशिया खंडातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या युवकांपैकी 'आश्वासक ३०' या यादीमध्ये मिथिलाचा समावेश करण्यात आहे. मिथिला वेबक्वीन म्हणूनही प्रसिद्ध आहे.


कपसाँग गर्ल मिथिला!

वेबसिरीज बरोबर, कप साँगमुळे मिथिला फेमस झाली. 'ही चाल तुरूतुरू' हे गाणं केवळ एका कपाच्या साहाय्याने वाजवल्यामुळे प्रेक्षकांना ते खूप आवडलं. त्यानंतर ती कप साँग गर्ल म्हणून फेमस झाली. त्याचबरोबर मिथिलाच्या हटके आणि वेगळ्या विषयांवरील वेबसिरीजने मिथिलाला वेगळी ओळख दिली.


बॉलिवुडमध्येही लवकरच पदार्पण!

'गर्ल इन द सिटी’, 'अॉफिशिअल चुक्यागिरी’, 'लिटिल थिंग्स' अशा वेबसिरीजमध्ये मिथिला झळकली. आजही या वेबसिरीज प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. मुरांबा या मराठी चित्रपटातून मिथिलाने चित्रपटसृष्टीत पदापर्ण केलं. तिच्या 'मुरांबा'तील कामाचेही अनेकांनी कौतुक केलं. लवकरच मिथिलाचा इरफान खानबरोबर 'कारवाँ' हा चित्रपट येतोय. 'कारवाँ'च्या निमित्ताने मिथिला बॉलिवूडमध्येही पदार्पण करतेय.


अशी करतात निवड

आशिया खंडातील ३० युवक-युवतींची यादी तयार केली जाते. संगीत, क्रीडा, रंगभूमी, ई-कॉमर्स, साहित्य, कायदा, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील ३० वर्षाखालील युवकांचा या यादीमध्ये समावेश करण्यात येतो. नीरज गंगाळ, सलील पांचाळ यांनी ही यादी संकलित केली आहे.

या आधी लेखक निपुण धर्माधिकारी आणि अभिनेता अलोक राजवाडे यांनाही फोर्ब्स यादीत स्थान मिळवण्यचा मान मिळाला होता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा