Advertisement

'सायकल'...एक आठवणींचा प्रवास!


'सायकल'...एक आठवणींचा प्रवास!
SHARES

प्रत्येकाला आपली एखादी वस्तू ही खूप प्रिय असते. ती वस्तू आपल्यापासून दूर गेली की आपल्याला त्याचा खूप त्रास होतो. अशाच एका प्रिय सायकलची कथा ४ मेला आठवणींचा प्रवास घडवणार आहे. 'सायकल' ही एक हलकीफुलकी कथा आहे, ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल!

सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकलवर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. एके दिवशी केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात. यामुळे निराश झालेल्या केशवला आपली सायकल नक्की मिळेल, ही आशा आहे. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना त्याच्या प्रवासादरम्यान त्या चोरांचे काय झाले? त्याला त्याची सायकल परत मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहेत.



कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी सायकल हा दिग्दर्शित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहेत. तसेच चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकेल यात शंका नाही. नुकताच या सिनेमाचा हलका फुलका ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे. या ट्रेलरमधून ते चोर भाऊ कदम आणि प्रियदर्शन जाधव आहेत हे एवढं कळलं. त्यामुळे हा चित्रपट बघताना प्रेक्षकांना मजा येणार हे नक्की.




हेही वाचा

विनोदी मल्टीस्टार्स घालणार ‘वाघेऱ्या’चा धुडगूस!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा