Advertisement

विजयालक्ष्मीच्या संगीताची अनोखी मैफल


विजयालक्ष्मीच्या संगीताची अनोखी मैफल
SHARES

वायकोम विजयालक्ष्मी हे एक असं नाव आहे, जिने अंधत्वावर मात करत संगीतसाधना केली आहे. दैवी देणगी लाभलेल्या विजयालक्ष्मीच्या नॉन-स्टॉप संगीताचा अनुभव घेण्याची संधी मुंबईकरांना लाभणार आहे.


शिवस्वामीमध्ये रंगणार मैफल...

रविवार, दिनांक १७ जून रोजी चेंबूर येथील शिवस्वामी ऑडीटोरियममध्ये विजयालक्ष्मीच्या संगीताची अनोखी मैफल रंगणार आहे. हिंदी, मराठी, पंजाबी, तेलुगू कन्नड, तमिळ भाषेत आणि मोहम्मद रफी, किशोरकुमार, मुकेश, दिलेर मेहंदी, लता मंगेशकर, के. एस चित्रा यांची मल्याळममधील गाणी या कार्यक्रमात ती सादर करणार आहे. संध्याकाळी ४:३० ते ९:३० या वेळेत सलग पाच तास विजयलक्ष्मी आपल्या संगीताद्वारे उपस्थितांवर मोहिनी घालणार आहे.


जागतिक विक्रमानंतरचा पहिला शो...

विजयालक्ष्मीने जग पाहिलं नसलं तरी संगीत जगतात आपला एक अनोखा विक्रम केला आहे. जागतिक विक्रमानंतर विजयालक्ष्मीचा प्रेक्षकांसाठीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. राज्याचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आनंद सहस्रबुद्धे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत.


सिनेमांमध्येही केलं परफाॅर्म...

गायत्री वीणा वादनात पारंगत असलेल्या विजयालक्ष्मीने आजवर देशातील विविध भागांमध्ये संगीताचे शोज् केले आहेत. विजयालक्ष्मीने ‘काट्टे काट्टे’ या मल्याळम सिनेमातील गाण्यातही परफॉर्म केलं आहे. यासोबतच विजयालक्ष्मीने आजवर एकूण २० सिनेमांमधील जवळजवळ ४० गाण्यांसाठी परफॉर्म केलं आहे. यात मल्याळमसह तमिळ, संस्कृत, तेलगू आणि कन्नड या चार भाषांमधील सिनेमांचा समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा