लोकनृत्य स्पर्धेत महापालिकेच्या बजाज रोड मराठी शाळेची बाजी


लोकनृत्य स्पर्धेत महापालिकेच्या बजाज रोड मराठी शाळेची बाजी
SHARES

महापालिका शाळांतंर्गत आयोजित लोकनृत्य‍ स्पर्धेतल्या अंतिम फेरीत बजाज रोड महापालिका मराठी शाळेच्या ‘तुरथाल’ या लोकनृत्यातने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक कुलाबा इंग्रजी शाळेच्या ‘छडिया’ या लोकनृत्याला, तर तिसरा क्रमांकासाठी वरळी सी फेस महापालिका शाळेच्या ‘झोलियांग नागा’ या लोकनृत्याची निवड झाली आहे.


कुठे झाली स्पर्धा?

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ‘बालकोत्सव २०१७-१८’ अंतर्गत अंतिम लोकनृत्यं स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मंगळवारी पार पडला.


विजेते कोण?

यावेळी स्पर्धेत विविध शाळांनी लोकनृत्य सादर केली. या लोकनृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम पुरस्कार देवनार मनपा शाळेच्या ‘ढोलकुनिया’, द्वितीय पुरस्कार कुरार व्हिलेज मनपा उर्दू शाळेच्या ‘टिपरी’ला, तृतीय पुरस्कार जे. व्ही स्कीतम महापालिका शाळेच्या ‘पंजाबी झाजरी’ला तर चतुर्थ पुरस्कार चंदनवाडी महापालिका शाळेच्या ‘शेतकरी’ नृत्याने पटकावला आहे. यासर्व विजेत्या संघांना चषक आणि रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.


पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचं अभिनंदन

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मेहनतीतून चांगल्या प्रकारचे लोकनृत्यु याठिकाणी सादर करण्यारत आले. यासर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी केलं. खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका प्रत्येक विद्यार्थ्यांमागे वर्षभरात ६० हजार रुपये खर्च करुन त्यांना दर्जेदार शैक्षणिक सेवा-सुविधा पुरवत असून येणाऱ्या परीक्षांचा निकालसुद्धा चांगला लागण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

लोकनृत्यु स्पर्धेच्या माध्य‍मातून देशभरातील विविध लोकसंस्कृती आणि त्यांचं जीवनमान यांची झलक पाहायला मिळाल्याचे यावेळी आवर्जून नमूद करून शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी पुरस्कार रप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संबंधित विषय