Advertisement

कोविड रिलिफ फंडसाठी चिंगारीचा पुढाकार, 'वर्ल्ड म्युझिक डे कॉन्सर्ट'चे आयोजन

चिंगारीकडून जाहीर करण्यात आलं आहे की, कॉन्सर्ट नफ्यातील १०० टक्के हिस्सा कोविड रिलीफ फंडाला देण्यात येणार आहे.

कोविड रिलिफ फंडसाठी चिंगारीचा पुढाकार, 'वर्ल्ड म्युझिक डे कॉन्सर्ट'चे आयोजन
SHARES

शॉर्ट-व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म चिंगारीनं 'वर्ल्ड म्युझिक डे कॉन्सर्ट' आयोजित केला आहे. २१ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ही मैफिल फ्लिपकार्ट सादर करणार आहे. यासोबतच चिंगारीकडून जाहीर करण्यात आलं आहे की, कॉन्सर्ट नफ्यातील १०० टक्के हिस्सा कोविड रिलीफ फंडाला देण्यात येणार आहे.

मैफलीच्या गायनात अभिनेता खुशबू ग्रेवाल, गायक - अभिजित सावंत, गायक - संगीतकार वेद शर्मा, गायक - संगीतकार साहिल शर्मा, गायक - संगीतकार आणि गीतकार रूपिन पाहवा, रोमानियन सिंगर-गीतकार केट लिन आणि धारिया, आयएमए पुरस्कार विजेता - हरीश मोयल यांचा समावेश आहे.

चिंगारी अॅपचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित घोष म्हणाले की, “आम्हाला, फक्त अव्वल राहायचं नाही तर आमच्या युजरसाठी काही मनोरंजनात्मक सादरीकरण देखील करायचे आहे. यासोबतच समाजासाठी देखील काहीतरी करायची इच्छा आहे. म्हणून वर्ल्ड म्युझिक डे चं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

चिंगारी अॅपचे सह-संस्थापक आणि सीओओ दीपक साळवी पुढे सांगतात, “आम्ही याद्वारे आमच्या वापरकर्त्यांना घऱच्या घरी संगीताची एक मेजवानी देत आहोत. यासोबतच कोविड रिलिफ फंडाला सहाय्य करत आहोत. थोडक्यात, चांगल्या कारणासाठी आम्ही पैसे गोळा करताना आमच्या वापरकर्त्यांना देखील आनंदी करत आहोत.”

प्रस्थापित गायकांव्यतिरिक्त, चिंगारी वापरकर्त्यांनासुद्धा त्यांचं कौशल्य दाखवायला मिळेल. स्पर्धेतील विजेत्यास मैफिलीतील सेलिब्रिटींसोबत गाण्याची संधी मिळणार आहे. तसंच ट्रूफॅन करीना कपूरचा वैयक्तिकृत व्हिडिओ संदेशही दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवार थेट चिंगारी संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात.हेही वाचा

"वाटेवरी मोगरा" सागरिकाचा नवा स्वरसाज

शिवानी बावकरची ‘लग्नाची पिपाणी’

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा