जवानांसाठी ढोलताशा पथकांचा पुढाकार

 Pali Hill
जवानांसाठी ढोलताशा पथकांचा पुढाकार

मुंबई – मालाड, गोरेगाव, जोगेश्वरीतील ढोलताशा पथकं रेल्वे स्थानक परिसरात एकाच दिवशी म्हणजे 5 नोव्हेंबरला सायंकाळी 4 ते 7 यावेळेत वादन करणार आहेत. यावेळी ढोलताशापथकातील शिलेदार आर्मी वेलफेअर फंड अंतर्गत निधी जमवून जवानांना एक मदतीचे हात देण्याचे आवाहन करणार आहेत. रुद्र ढोलताशा पथक गोरेगाव पूर्व स्टेशन, रणझुंजार ढोलताशा पथक मालाड पश्चिम स्टेशन, नादगर्जना ढोलताशा पथक जोगेश्वरी पूर्व, शिवगजर प्रतिष्ठान मालाड पूर्व स्टेशन जवळ आणि चारकोप मार्केट येथे हे वादन कऱण्यात येईल. हे वादन पाकचा होणाऱ्या अतिरेकी कारवाईंचा निषेध म्हणून करण्यात येणार आहे. तसेच वादनावेळी कोणीही स्वत:च्या पथकांचा गणवेष न घालता काळ्या रंगाची कपडे घालून वादन करणार असल्याची माहिती रणझुंजार ढोलताशा पथकाचे अध्यक्ष हरेश साळवी यांनी दिली.

Loading Comments