भक्तीगीतांचा ध्वनीप्रकाशन सोहळा


  • भक्तीगीतांचा ध्वनीप्रकाशन सोहळा
SHARE

शिवडी - त्रिमुर्ती नवरात्रौत्सव मंडळच्या वतीने शिवडीची माऊली भक्तीगीतांचा ध्वनीप्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याचे प्रकाशन मुंबईचे माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र मनसे उपाध्यक्ष नंदकुमार चिले, मराठी अभिनेते अभय राणे, दिल दोस्ती दुनियादारी - किंजल फेम अभिनेत्री सुविधा देसाई व मंडळाचे अध्यक्ष शेखर मोकल उपस्थित होते. गेल्या 29 वर्षांपासून मंडळ नवरात्रोत्सव साजरा करत आहे. या दरम्यान विविध पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा मंगळागौर स्पर्धा, देवीचा गोंधळ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे मंडळाचे सचिव प्रशांत चव्हाण यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या