नाकातून गात मुग्धा कऱ्हाडेने केली ‘तोडफोड...’

‘बॉईज २’ या मराठी सिनेमातील ‘तोडफोड...’ हे गाणं मुग्धाने संपूर्णतः नाकातून गायलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत आयटम साँग करण्याचा मुग्धाचा पहिलाच प्रयत्न पूर्णत: यशस्वी ठरला आहे.

  • नाकातून गात मुग्धा कऱ्हाडेने केली ‘तोडफोड...’
SHARE

‘गोल गोल केक, त्याची क्रीम गोड गोड...’ असं म्हणत महाराष्ट्रातल्या तमाम ‘बॉईज’ना नाचवणाऱ्या गायिका मुग्धा कऱ्हाडेचं आयटम साँग सध्या गाजत आहे. ‘बॅाइज’प्रमाणेच ‘बॅाइज २’ मधील मुग्धाचं ‘तोडफोड...’ हे गाणं तरुणाईच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे.आयटम साँग

‘बॉईज २’ या मराठी सिनेमातील ‘तोडफोड...’ हे गाणं मुग्धाने संपूर्णतः नाकातून गायलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत आयटम साँग करण्याचा मुग्धाचा पहिलाच प्रयत्न पूर्णत: यशस्वी ठरला आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, जेव्हा अवधूत गुप्तेने या गाण्याची चाल मला चाल ऐकवली, तेव्हा हे गाणं एका वेगळ्याच पठडीतलं असल्याची जाणीव झाली. अवधूतबरोबर मी अनेक गायनाचे कार्यक्रम केले आहेत. तसंच काही सिनेमातील गाण्यांचं पार्श्वगायनदेखील केलं आहे. मात्र, हे गाणं संपूर्णतः नाकातून गाण्याचा माझा हा पहिलाच प्रयन्त आहे.


मिरची अॅवॉर्ड्सने गौरव

अवधूत गुप्तेच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘एक तारा' या मराठी चित्रपटातील ‘विसर तू...’ या गाण्याद्वारे मुग्धाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं, विशेष म्हणजे या गाण्यासाठी तिला मिरची अॅवॉर्ड्सने गौरविण्यातही आलं. त्यानंतर मुग्धाने ‘तेरे बिन मरजावा’ आणि ‘मंत्र’ या चित्रपटांमध्ये पार्श्वगायिका म्हणून काम केलं आहे. मॅकेनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेली मुग्धा सध्या एल अँड टी कंपनीत कार्यरत आहे.


साऊंड इंजिनियरिंगचं प्रशिक्षण

मुग्धाचं कार्यक्षेत्र गायनापासून अगदीच वेगळं असलं तरी अगदी लहानपणापासूनच मुग्धा गायनाचं प्रशिक्षण घेत होती. त्यानंतर, सुरेश वाडकर यांच्या आजीवासन स्टुडिओमधून तिने साऊंड इंजिनियरिंगचं प्रशिक्षणदेखील घेतलं. शिवाय याच स्टुडिओत काही काळ नोकरी करत तिने संगीताची आपली आवड कायम जोपासली.


मावस भावंडं

अवधूत आणि मुग्धा ही मावस भावंडं असल्याकारणामुळे ते दोघंही बालपणापासून एकत्र गाण्याचा रियाज करत असत. या जोडगोळीने अनेक लाईव्ह शोज तसंच गायनाच्या बैठकीचे कार्यक्रमही केले आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये ही कलाकार जोडी गेल्या साडेतीन वर्षांपासून एकत्र काम करत आहे.


५ ऑक्टोबरला प्रदर्शित 

इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्तेच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेला हा ‘बॉईज २’ हा सिनेमा ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन विशाल देवरुखकरने तर, संवादलेखन ऋषिकेश कोळीने केलं आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया ‘बॉईज २’चे निर्माते आहेत.हेही वाचा -

अभिनेता संतोष मयेकरचं आकस्मिक निधन

कलाकारांच्या आवाजात अवतरली ‘चंद्रमुखी...’! 

संबंधित विषय
ताज्या बातम्या