कलाकारांच्या आवाजात अवतरली ‘चंद्रमुखी...’!

प्रविण राजा कारळे दिग्दर्शीत ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमातील ‘चंद्रमुखी...’ हे हळदीचं गाणं अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव या कलाकारांच्या आवाजात रेकॅार्ड करण्यात आलं आहे.

  • कलाकारांच्या आवाजात अवतरली ‘चंद्रमुखी...’!
  • कलाकारांच्या आवाजात अवतरली ‘चंद्रमुखी...’!
SHARE

भारतीय सिनेसृष्टीत गायन आणि अभिनय करणाऱ्या कलाकारांची फार मोठी परंपरा आहे. मराठी कलाकारही याला अपवाद नाहीत. त्यामुळेच बऱ्याच मराठी सिनेमांमध्येही कलाकारांच्या आवाजातील गाणी ऐकायला मिळत असतात. ‘हृदयात समथिंग समथिंग’ या आगामी मराठी सिनेमासाठी त्यातील कलाकारांनीही ‘चंद्रमुखी...’ हे गाणं गायलं आहे.हळदीचं गाणं 

प्रविण राजा कारळे दिग्दर्शीत ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमातील ‘चंद्रमुखी...’ हे हळदीचं गाणं अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव या कलाकारांच्या आवाजात रेकॅार्ड करण्यात आलं आहे. गीतकार सागर खेडेकर यांनी लिहिलेलं हे गीत संगीतकार सुकूमार दत्ता यांनी संगीतबद्ध केलं आहे.


प्रथमच पार्श्वगायन

या सिनेमातील बऱ्याच कलाकारांनी या गाण्याच्या माध्यमातून प्रथमच पार्श्वगायन केलं असलं तरी अशोक सराफ यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याने फार पूर्वीच पार्श्वगायन करीत आपल्या चाहत्यांना मोहीत केलं आहे. ‘कळत नकळत’ या गाजलेल्या सिनेमातील ‘नाकावरच्या रागाला औषध काय...’ हे खट्याळ गीत आजही अनेकांच्या स्मरणात आहे. ‘चंद्रमुखी...’ गाण्याविषयी सराफ म्हणाले की, या अगोदर ‘सगे-सोयरे’ आणि ‘कळत-नकळत’ सिनेमांमधून मी गाणं गायलं आहे. त्यामुळे हे गाणं रेकॉर्ड होताना त्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगचा अनुभव गाठीशी होताच. शिवाय हे हळदीचं गाणं असलं तरी मिश्कील बाजाचं असल्याने ते आम्हा कलाकारांच्या आवाजात शोभून दिसतं. उडत्या चालीत 

अनिकेत विश्वासराव म्हणाला की, माझा सिनेसृष्टीत प्रवेश अशोक मामांसोबतच्या सिनेमामधून झाला. आता पार्श्वगायनात पदार्पण होतानाचं गाणंही अशोक मामांसोबतच आहे. त्यामुळे मी स्वत:ला लकी समजतो. सिनेमाचे निर्माते विनोदकुमार जैन गाण्याविषयी सांगतात की, सागर खेडेकर यांनी लिहिलेलं हे गीत सुकूमार दत्तांनी उडत्या चालीत इतकं चपखलपणे बसवलं आहे की, गाणं पटकन ओठांवर रूळतं. आम्ही चित्रीकरणादरम्यान हे गाणं सतत गुणगुणत होतो. त्यामुळेच सिनेरसिकांनाही हे गाणं खूप आवडेल असा पूर्ण विश्वास आहे.हेही वाचा -

‘बॉईज २’च्या ट्रेलर लाँचला 'यांनी' केली धमाल!

म्हणून सलमानने 'लवरात्री' सिनेमाचं नाव 'लवयात्री' केलं! 

संबंधित विषय
ताज्या बातम्या