डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशेष आदरांजली


SHARE

वडाळा - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयारी सुरू झालीय. त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दरवर्षी मुंबईत दाखल होतात. यंदा डॉ. आंबेडकरांना विशेष आदरांजलीची जबाबदारी डॉ . बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीनं स्वीकारली होती. त्यानुसार डॉ. आंबेडकरांना अभिवादन म्हणून शास्त्रीय संगीतातले दिग्गज उपस्थित राहणार आहेत. सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया, वीणावादक पंडित विश्वमोहन भट आणि व्हायोलियन वादक पंडित अतुल उपाध्ये आदींचा त्यात समावेश आहे.

पंडित हरिप्रसाद चौरासिया बुद्धम शरणंम गच्छामीचे स्वर बासरीवर आळवतील, वीणावादक पंडित विश्वमोहन भट आणि व्हायोलिनवादक पंडित अतुल उपाध्ये 'भिमराया घे तुला या लेकरांची वंदना' गाण्याला आपल्या वाद्यांनी स्वरसाज देणार आहेत. पखवाज (मृदंग) वादक पंडित भवानी शंकर, सारंगी वादक उस्ताद दिलशाद खान, तबला वादक पंडित मुकेश जाधव हे 'उद्धारली कोटी कुळे ,भिमा तुझ्या जन्मामुळे' या गाण्यास संगीत देतील.
पखवाजवादक पंडित भवानी शंकर, सारंगी वादक उस्ताद दिलशाद खान, तबला वादक पंडित मुकेश जाधवही आपल्या गाण्यातून बाबासाहेबांना मानवंदना देणार आहेत.
मंगळवारी, 6 डिसेंबरला, सकाळी 6 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वडाळा पश्चिम येथे हा कार्यक्रम होणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी होणाऱ्या या विनामूल्य कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. सहभागासाठी संपर्क - 9930844089.

संबंधित विषय
ताज्या बातम्या