निवडक बाबुजी संगीतसंध्या

 Jogeshwari
निवडक बाबुजी संगीतसंध्या
निवडक बाबुजी संगीतसंध्या
See all

जोगेश्वरी - पूर्व येथील सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणारे व्यासपिठ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्य कट्टा येथे रविवारी निवडक बाबुजी या संगीतसंध्याचं आयोजन करण्यात आलं.
राज्याचे गृहनिर्माण आणि पालकमंत्री तसेच जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर, नगरसेवक अनंत नर आणि नगरसेवक प्रविण शिंदे यांच्या संकल्पनेतुन या संगीतसंध्येचं आयोजन करण्यात आलं होतं.

निवडक बाबुजी या संगीतसंध्येत संगीत स्वरगंध सुधीर फडके यांनी स्वरबध्द केलेल्या देहाची तिजोरी, स्वर आले दुरूनी, अशी पाखरे येती आदी संगीतांचा नजराणा सादर करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन संगीतकार आणि गायक श्रीधर फडके उपस्थित होते. शेकडो नागरिकांना या संगीतसंध्येचा स्वरधुंद आस्वाद लुटला आणि गायकांच्या सुरेल आवाजाने रसिकश्रोत्यांची मने जिंकुन गेली होती. निरूपणकार आणि कट्टासमन्वयक अनिल म्हसकर यांनी रसिकश्रोत्यांचे आभार मानुन या कार्यक्रमात आपल्या सुश्राव्य निवेदनातुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Loading Comments