Advertisement

१५०व्या गांधी जयंतीनिमित्त घुमणार 'ईश्वर अल्ला तेरे नाम'चा सूर

राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा गांधींची जयंती देशाच्या कानाकोपऱ्यात दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जाते. यंदा १५० व्या गांधी जयंतीचं औचित्य साधत मुंबईतील एनसीपीएमध्ये 'ईश्वर अल्ला तेरे नाम'चा सूर घुमणार आहे.

१५०व्या गांधी जयंतीनिमित्त घुमणार 'ईश्वर अल्ला तेरे नाम'चा सूर
SHARES

राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा गांधींची जयंती देशाच्या कानाकोपऱ्यात दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जाते. यंदा १५० व्या गांधी जयंतीचं औचित्य साधत मुंबईतील एनसीपीएमध्ये 'ईश्वर अल्ला तेरे नाम'चा सूर घुमणार आहे.

प्रार्थना ही कोणा खास व्यक्तीची मक्तेदारी नसते. ती कोणतीही विशिष्ट जात किंवा समुदायासाठी कटीबध्द नसते. ती सर्वसमावेशक आणि संपूर्ण मानवतेशी निगडीत असते. प्रार्थनेच्या माध्यमातून पृथ्वीवर स्वर्गसदृष्य वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात असतो. हेच लक्षात घेउन महात्मा गांधींनी त्यांच्या आश्रमांमध्ये प्रार्थनेला दैनंदिन दिनक्रमाचा भाग बनवले होते. या नित्य प्रार्थनेच्या माध्यमातूनच त्यांना देव म्हणजेच सत्य या नितीवचनाऐवजी सत्य म्हणजेच देव या वचनाचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळेच गांधींना सगळीकडे ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत होता असं म्हटलं जातं.

एनसीपीएच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा एक भाग म्हणून द नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस म्हणजेच एनसीपीएनं शनिवार, दि. २१ सप्टेंबर २०१९ रोजी टाटा थिएटरमध्ये महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त 'ईश्वर अल्ला तेरे नाम' या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात बहुभाषिक भजन आणि भक्तीगीतांच्या सुरेल मिलाफातून देशाच्या राष्ट्रपित्याला श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिध्द गायक रुपकुमार राठोड, साधना सरगम, घनशाम वासवानी, हेमा देसाई, आलाप देसाई आणि अशित देसाई राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना बहुभाषिक भजन आणि भक्तीगीतांच्या सुरेल मिलाफातून संगीतमय श्रध्दांजली वाहतील. संस्कृत, गुजराती, हिंदी, मराठी, सिंधी, बंगाली आणि इंग्लिश भाषेतील गाणी सादर केली जाणार आहेत.



हेही वाचा -

राशीचं भविष्य मांडणार 'आलंय माझ्या राशीला'

सायली-शिवानी बनल्या सलमानच्या नायिका!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा