Advertisement

सावनी रविंद्रचं नवरात्री स्पेशल गुजराती गाणं

मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलगू या भाषांमध्ये गाणी गायल्यावर आता सावनीनं पहिल्यांदाच गुजरातीत गाणं गायलं आहे. राधा-कृष्णाच्या अलौकिक प्रेमाला समर्पित ‘कानुडा’ हे भक्तीपर रास-गरबा गाणं रिलीज झालं आहे.

सावनी रविंद्रचं नवरात्री स्पेशल गुजराती गाणं
SHARES

विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गायलेली गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्र आता नवरात्री निमित्तानं आपल्या चाहत्यांसाठी गुजराती रास-गरबा गाण्याची एक सुरेल भेट घेऊन आली आहे. मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलगू या भाषांमध्ये गाणी गायल्यावर आता सावनीनं पहिल्यांदाच गुजरातीत गाणं गायलं आहे. राधा-कृष्णाच्या अलौकिक प्रेमाला समर्पित ‘कानुडा’ हे भक्तीपर रास-गरबा गाणं रिलीज झालं आहे.  

‘सावनी ओरीजीनल्स’ या तिच्या म्युझीकल सिरीजमधील हे तिसरं गाणं आहे. याबाबत सावनी म्हणाली की, आमच्या घरी घटस्थापना केली जाते. माझी आई नऊ दिवस उपवास करते. प्रत्येक दिवसाचा वेगळा नैवेद्य असतो. या नऊ दिवसांतून एक वेगळीच उर्जा वर्षभरासाठी आपल्याला मिळते. त्यामुळं मला नवरात्रोत्सव खूप आवडतो. मी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायलेय, पण गुजराती गाणं गाण्याची इच्छा अपूर्ण होती. रास-गरब्याच्या या गाण्यानं ती पूर्ण झाली.

सावनी या गाण्यात रास-गरबा करतानाही दिसत आहे. पहिल्यांदाच आपल्या म्युझिक व्हिडीओमध्ये तिनं डान्स-मुव्ज केल्या आहेत. याविषयी विचारल्यावर सावनी म्हणाली की, गायक असल्यानं लहानपणापासून नवरात्रीमध्ये नेहमी गाणी गायली आहेत. गरबा केला नव्हता. आता ती इच्छा ही या नव्या सिंगलव्दारे पूर्ण झाली. मी सोडून या म्युझिक व्हिडीयोवर काम करणारी संपूर्ण टीम गुजरातीच आहे. या गाण्याचे संगीतकार पार्थिव शाह आणि गीतकार प्रणव पांचाल आहेत. सह-गायक कौशल पिठाडिया हा अहमदाबादचा आहे. कौशलकडून मी गुजराती भाषेचा लहेजा शिकले. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हॉइस टेक्सचर्समध्ये गाणं गायलं आहे.



हेही वाचा -

या सिनेमात अनुभवा अंकुश-शिवानीची केमिस्ट्री

सई ताम्हणकर पुन्हा दिसणार धाडसी भूमिकेत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा