'युवती म्युझिक'चं दर आठवड्याला नवं ‘अनप्लग्ड’ गाणं!

दोन वर्षांपूर्वी १६ जून रोजी आलेल्या युवती म्युझिकने 'बावरी साद...' या युगुल व्हिडिओ गीतासोबतच संगीतक्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं होतं. याला दोन वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत युवती म्युझिकने एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला संगीतक्षेत्रातील ज्येष्ठ मंडळींसह उदयोन्मुख गायक-संगीतकारांनीही हजेरी लावली होती.

SHARE

नव्या पिढीच्या गीतकार, गायक, संगीतकारांना हक्काचं व्यासपीठ देण्याच्या उद्देशानं 'युवती म्युझिक' कंपनीनं दर आठवड्याला एक नवं ‘अनप्लग्ड’ गाणं देण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन वर्षांपूर्वी १६ जून रोजी आलेल्या युवती म्युझिकने 'बावरी साद...' या युगुल व्हिडिओ गीतासोबतच संगीतक्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं होतं. याला दोन वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत युवती म्युझिकने एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला संगीतक्षेत्रातील ज्येष्ठ मंडळींसह उदयोन्मुख गायक-संगीतकारांनीही हजेरी लावली होती.


दर आठवड्याला एक नवं गाण

आता या कंपनीने ‘अनप्लग्ड’ संगीत निर्मितीवर लक्ष केंद्रित करत दर आठवड्याला एक नवं ‘अनप्लग्ड’ गाणं देण्यावर भर दिला आहे. नव्यानं संगीतक्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या तरुणांसाठी आणि त्यांच्यासाठी निर्मिती करणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या सध्याचा काळ अत्यंत नाजूक आहे. पण विचारांसोबत कुठेही तडजोड न करता खंबीरपणे गेली दोन वर्षे ‘युवती म्युझिक’चे प्रमोद वाघमारे संगीतक्षेत्रात धडपडणाऱ्या तरुणाईच्या पाठीशी उभे आहेत.


अमर्याद संगीताचा लुटा आनंद

मागील दोन वर्षांत वाघमारे यांनी सातत्यानं नाविन्यपूर्ण संगीतरचना देण्यात यश मिळवलं आहे. द्वीतीय वर्षपूर्ती होत असताना आणखी एक पाऊल टाकत ‘अनप्लग्ड’ गाण्यांसोबातच ‘युवती म्युझिक’ नवं ‘अॅप’ तयार करून संगीत रसिकांशी आणखी जवळीक निर्माण करणार आहे. या नव्या अॅपवर रसिकांना बिनधास्त अमर्याद संगीताचा आनंद लुटता येणार आहे.


'हे' हक्काचं व्यासपीठ

दोन वर्षांच्या या संगीत सफरीबद्दल बोलताना ‘युवती म्युझिक’चे सर्वेसर्वा वाघमारे म्हणाले की, ही सफर सुरिली आणि मधुर होती. पहिलं गाणं रिलीज झाल्यानंतर सातत्याने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीत कलाकृतींची निर्मिती होत राहिली. त्यामुळे नवोदित कलावंतांचं ‘युवती म्युझिक’ हे हक्काचं व्यासपीठ बनलं. भारतासह जगभरातील संगीतप्रेमी आणि कलावंत युवतीसोबत जोडले गेल्याने जबाबदारीही वाढली आहे.


‘अनप्लग्ड’ गाण्यांची शृंखला

पहिल्या वर्षीच्या यशस्वी वाटचालीनंतर ही परंपरा पुढे सुरू ठेवत ‘युवती म्युझिक’ने ‘अनप्लग्ड’ गाण्यांची शृंखला सुरु केली. ‘तेरी याद...’ हे त्यांनी पाहिलं गीत सादर केलं. गायक अक्षय कर्णिक आणि संगीतकार उमेश कुलकर्णी यांना ही पहिली संधी मिळाली. त्यानंतर पवन वडूरकर या वैदर्भीय तरुणाच्या ‘आई...’ ही कलाकृती सादर केली. तसेच राहुल सक्सेना, पियुष भिरूड, कोमल धांदे, विजय गटलेवार यांच्या गीतांनीही रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विजय गटलेवारचं आणखी एक नवं गीत लवकरच येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या