Advertisement

शिवसेनेच्या 12 खासदारांना Y श्रेणीची सुरक्षा

राहुल शेवाळे यांची शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यासाठी शिवसेनेच्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.

शिवसेनेच्या 12 खासदारांना Y श्रेणीची सुरक्षा
SHARES

आमदारांच्या बंडखोरीनंतर आता उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे.

सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व 12 खासदारांशी व्हिडिओ कॉलवर बैठक घेतली. तेव्हापासून आमदारांच्या बंडखोरी पाठोपाठ उद्धव ठाकरेंना खासदारांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

शिंदे गटात जाणाऱ्या शिवसेनेच्या (Shiv Sena) संभाव्य खासदारांना सुरक्षा कवच देण्यात आलं आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांचं निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर नागपूरमधील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे.

शिवसेनेचे खासदारही बंड करण्याची शक्यता आहे. हे खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. 

'हे' खासदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता

1. राहुल शेवाळे
2. भावना गवळी
3. कृपाल तुमने
4. हेमंत गोडसे
5. सदाशिव लोखंडे
6. प्रतापराव जाधव
7. धर्यशिल माने
8. श्रीकांत शिंदे
9. हेमंत पाटील
10. राजेंद्र गावित
11. संजय मंडलिक
12. श्रीरंग बारणे 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा