Advertisement

गुजराती पाट्या तोडफोड प्रकरणी २० मनसैनिकांवर पोलिसांची कारवाई


गुजराती पाट्या तोडफोड प्रकरणी २० मनसैनिकांवर पोलिसांची कारवाई
SHARES

गुजराती पाट्यांची तोडफोड आणि ओला टॅक्‍सीची काच फोडल्याप्रकरणी सुमारे २० मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांन दिली आहे.


दंगली घडवल्याने गुन्हा दाखल

पहिल्या घटनेत, सोमवारी दुपारी अंधरी पूर्व येथील साटमवाडी जंक्‍शन येथे ओला टॅक्‍सीची काच फोडल्याप्रकरणी नितीन नांदगावकर यांच्यासह १६ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर दंगल आणि जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


४ मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

दुसऱ्या घटनेत, गुजराती पाट्यांविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी कांदिवलीत केलेल्या आंदोलनाप्रकरणी समता नगर पोलिसांनी अक्षय येडगे, रुपेश धनावडे, अमित हुमणे आणि संदेश ठसाळे या चार मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

कांदिवलीत राजुभाई ढोकळावाला यांचे फरसाणचं दुकान आहे. या दुकानाची पाटी गुजराती असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी ही पाटी फोडली होती. दरम्यान, यापूर्वी या दुकानाला अनेकवेळा निवेदन देण्यात आल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आणखी एका घटनेत दोन व्यक्तींनी खासगी टॅक्‍सी फोडल्याचा प्रकार घडला. त्यावेळी टॅक्‍सीत कोणीही नव्हते. टॅक्‍सी चालकाच्या तक्रारीवरून याप्रकरणी नेहरू नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा