महापालिका निवडणुकीच्या रिंगणात 2,718 उमेदवार

  Mumbai
  महापालिका निवडणुकीच्या रिंगणात 2,718 उमेदवार
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत तब्बल सुमारे 2 हजार 718 अर्ज भरले गेले. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. गुरुवारी रात्री पक्षच्यावतीने एबी फॉर्म देण्यात आले होते. शुक्रवारी विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, मंगेश सातमकर, किशोरी पेडणेकर, आशिष चेंबूरकर, मनसेच्या स्वप्ना संदीप देशपांडे, संतोष धुरी, स्नेहल जाधव, भाजपाचे मनोज कोटक, प्रभाकर शिंदे यांच्यासह विविध पक्षातील उमेदवारांनी आपले अर्ज भरले.

  यावेळी प्रथमच ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रणाली राबवण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत 8 हजार 041 जणांनी ऑनलाईनद्वारे अर्जांची नोंदणी केली होती. परंतु गुरुवारपर्यंत 622 उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते. पण शुक्रवारी शेवटच्या दिवशी 2 हजार 718 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्व उमेदवारांचे ऑनलाईन कागदपत्रे आणि अर्ज भरण्यात आल्यामुळे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अत्यंत जदगतीने होत आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करताना गर्दी होऊनही उमेदवार आणि अधिकाऱ्यांची कोणतीही तारांबळ उडाली नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.