Advertisement

निवडणूक निकालांवर सट्टेबाजांनी लावले ४० हजार कोटी

राजस्थानमध्ये भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना नागरिक नाकारतील, मध्यप्रदेशमध्ये ही परिस्थिती फार काही वेगळी नाही. तर छत्तीसगड मध्ये ही भाजप विरोधी वातावरण नसले, तरी भाजप काटावर पास होईल अशी आशा सट्टेबाजांनी व्यक्त केली आहे.

निवडणूक निकालांवर सट्टेबाजांनी लावले ४० हजार कोटी
SHARES

साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुकीवर आतापर्यंत ४० हजार कोटी रुपयांचा सट्टा मुंबईतील बुकींनी लावला आहे. या सट्टेबाजांच्या अंदाजावरून तिन्ही राज्यात काँग्रेसचे वर्चस्व राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निवडणूकीच्या पूर्वसंध्येला सट्टेबाजांनी मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला २३० पैकी ११७, राजस्थानमध्ये २०० पैकी १२७ जागा आणि छत्तीसगडमध्ये ९० पैकी ४३ जागा मिळतील असे भाकित वर्तवत सट्टा लावला जात आहे. 


राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा

देशातील लक्ष वेधून घेणाऱ्या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल उघड होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या निवडणुकीवर अनेक मातब्बर राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणूकीच्या पूर्वसंध्येला या तिन्ही राज्यातील निकालांवर सट्टेबाजांनी भरभरून पैसे ओतले आहेत. सट्टेबाजांनी यावेळी काँग्रेसवर विश्वास दाखवत कमळला नाकारले आहे. 


काँग्रेसला पसंती

राजस्थानमध्ये भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना नागरिक नाकारतील, मध्यप्रदेशमध्ये ही परिस्थिती फार काही वेगळी नाही. तर छत्तीसगड मध्ये ही भाजप विरोधी वातावरण नसले,  तरी भाजप काटावर पास होईल अशी आशा सट्टेबाजांनी व्यक्त केली आहे. या तिन्ही राज्यांच्या निवडणुकींवरच काही महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची रणनिती ठरणार आहे. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी भाजपचे नेते प्राण पणाला लावून आहेत. 


माहितीद्वारे निकालांवर सट्टा 

सट्टेबाज स्थानिक परिस्थिती आणि राजकिय जाणकारांच्या माहितीद्वारे निकालांवर सट्टा खेळतात.  जो उमेदवार पडणार असतो त्याला कमी भाव दिला जातो. तर जो उमेदवार किंवा पक्ष विजयी उंबरठ्यावर असतो त्याच्यावर जास्त बोली लावली जाते. बदलत्या समिकरणांनुसार सट्टेबाजारात राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेससाठी वातावरण अनुकुल आहे. तर छत्तीसगडमध्ये भाजप काठावर विजयी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा