मतदान यादीत घोळ, मतदार नाराज

 Mumbai
मतदान यादीत घोळ, मतदार नाराज
मतदान यादीत घोळ, मतदार नाराज
मतदान यादीत घोळ, मतदार नाराज
See all
Mumbai  -  

शिवडी - मतदानाचा टक्का वाढावा म्हणून महानगरपालिकेच्या वतीने विविध जनजागृती मोहीम राबवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर उमेदवारांनी प्रचार करून मतदान करा असं आवाहन देखील केलं होतं. त्यानुसार मंगळवारी मतदान करण्यासाठी अनेक मतदार आवर्जून घराबाहेर पडले. पण, मतदान केंद्रावर यादीत आपले नाव नसल्याने अनेकांनी पालिकेविरोधात संताप व्यक्त केला.

प्रथम मतदान मग काम अशी भूमिका घेऊन सकाळीच घराबाहेर पडलेल्या अनेक मतदारांना यादीत नाव नसल्याने मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना आवाहन करण्यासाठी घोषणाबाजी किंवा उपयोजनेमध्ये वेळ वाया घालविण्यापेक्षा मतदार यादीकडे लक्ष देण्याची गरज होती अशा संतप्त प्रतिक्रिया शिवडी पश्चिम येथील कीर्ती महानगरपालिका शाळेच्या केंद्रात मतदानासाठी आलेल्या मतदारांनी व्यक्त केल्या.

तर, यंदा प्रभाग रचना बदलल्यामुळे अनेक नागरिकांना आपला वॉर्ड तसंच नेमके मतदार केंद्र कुठे आहे याची सविस्तर माहिती नसल्याने अनेक मतदारांनी घरी राहणं पसंत केलं. तर, कोणी एक ते दोन मतदार केंद्रावर यादीत नाव नसल्याचे पाहून घराचा रस्ता पकडला. पूर्वी कोणत्या केंद्रात करायचे याचे निश्चित स्थळ एका पावतीद्वारे घरी येत होते. परंतु, यंदा 40 टक्के देखील मतदारांना सदरील पावत्या घरपोच न मिळाल्याने महापालिका एफ - दक्षिण विभागात मतदानकर्त्यांची दमछाक झाल्याचं चित्र मतदार केंद्रांवर पाहायला मिळाले.

Loading Comments