Advertisement

अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे 9 मंत्री धोक्यात, जयंत पाटील म्हणाले...

9 आमदारांनी घेतलेल्या निर्णयानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर कारवाई करायला सुरूवात केली आहे.

अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे 9 मंत्री धोक्यात, जयंत पाटील म्हणाले...
SHARES

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे. या 9 आमदारांनी घेतलेल्या निर्णयानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर कारवाई करायला सुरूवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राष्ट्रवादीच्या या 9 सदस्यांना अपात्र करावं, यासाठीचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. याचसोबत घडलेल्या घडामोडींबाबत निवडणूक आयोगालाही कल्पना दिली असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.

'राष्ट्रवादीच्या 9 सदस्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्य अध्यक्षांना कोणतीही कल्पना न देता पक्षाच्या विरोधी जाऊन राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतली. ती त्यांची कृती बेकायदेशीर आहे. शरद पवारांना अंधारात ठेवून करण्यात आलेली कृती आहे. डिसक्वालिफिकेशन पेटिशन विधानसभा अध्यक्षांकडे फाईल केलं आहे. ईमेलवर त्यांना पाठवलं आहे. फिजिकल कॉपी पाठवण्याची व्यवस्था करत आहे', अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

'मी स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. व्हॉट्सऍपवर पेटिशन पाठवलं आहे. त्यांनी लवकरात लवकर आमची बाजू ऐकून घ्यावी. निवडणूक आयोगालाही आम्ही कल्पना दिलेली आहे. सर्व कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत', असं जयंत पाटील म्हणाले.

'9 आमदार म्हणजे पक्ष होऊ शकत नाही. त्यांनी ज्यावेळी शपथ घेतली तेव्हाच ते अपात्र झाले आहेत, कारण त्यांनी पक्षविरोधी काम केलं आहे. 9 जणांविरोधात ही कारवाई असणार आहे. कारण बाकीचे आमदार आमच्याशी संपर्क साधत आहेत, त्यांचा यात काही दोष नाहीये. अनेक आमदारांनी मला आणि पवार साहेबांना संपर्क साधला आहे. ज्यांनी शपथ घेऊन पक्षाला धोका दिला त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.



हेही वाचा

10 जुलैपर्यंत मंत्री मंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा