Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, राजू पाटील म्हणाले...

मनसेचे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, राजू पाटील म्हणाले...
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात मंगळवारी झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी ठाण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाषणापूर्वी राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली होती. राज ठाकरे यांनीही ही तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली होती. याच कारणावरून आता राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरून मनसे आमदार राजू पाटील ट्वीट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राजू पाटील यांनी म्हटले की, शिवरायांचे प्रतिक म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून दाखवली तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज आहे? विचारांबरोबर धर्म पण बदललात काय? एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब …! अशा शब्दात राजू पाटील यांनी सरकारवर टीका केली.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी सार्वजनिक कार्यक्रमात तलवार उंचावल्याप्रकरणी मोहित कंबोज, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता.



हेही वाचा

"त्याला महत्त्व देऊ नये",अजित पवारांची राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया

MSRTC Strike Row: शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पत्रकार अटकेत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा