आबांच्या मुलीकडे राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी

 Vidhan Bhavan
आबांच्या मुलीकडे राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी
Vidhan Bhavan, Mumbai  -  

नरिमन पॉइंट - राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची कन्या स्मिताकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे. तिची महाराष्ट्र प्रदेश युवती पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षानं दिलेली जबाबदारी स्मितानं स्वीकारली असून ती चांगल्या पद्धतीनं पेलण्यास तयार असल्याचंही तिनं म्हटलंय.

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा पक्षाचा विचार तळागाळातल्यांपर्यंत पोहचवणार, गोरगरीब जनतेला मदतीचा हात देणार, असं स्मिताने म्हटलंय. कोपर्डी, सांगली, पुणे येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटना या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं सांगून गृहविभागासाठी वेगळा आयुक्त नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार ती म्हणाली. युवतींमध्ये अशा घटनांना आळा घालण्यासाठी धाडस निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असून महाराष्ट्रभर युवतींची ताकद उभी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही तिने या वेळी सांगितलं.

Loading Comments