कृष्ठरोगी रुग्णांसाठी रेटिनाच्या माध्यमातून आधार क्रमांक काढणार


SHARE

राज्यातील स्वयंभू कुष्ठरोग वसाहतीतील कुष्ठरोगी रुग्णांना बोट नसतात. त्यामुळे त्यांचे आधार क्रमांक रेटिनाच्या माध्यमातून काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.


अजित पवारांची मागणी

राज्यात अनेक कुष्ठरोगी रुग्ण आहेत. सरकारने सर्व नागरिकांना आधार सक्तीचे केले आहे. पुढे जाऊन टप्प्याटप्प्यांनी आधार आणखी सक्तीचे होईल. पण काही कुष्ठरोगी बांधवांना हाताचे ठसे नसतात त्यांच्यासाठी सरकारने पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. दरम्यान तावडेंनी आधार क्रमांक रेटिनाच्या माध्यमातून काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.


ही सक्ती उठवली

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांसाठी ३१ मार्चपर्यंत आधार क्रमांक संलग्न करण्याची सक्ती होती. मात्र दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ही सक्ती उठवण्यात आल्यामुळे बँका तसेच स्वस्त धान्य दुकानात आधार क्रमांकासाठी सक्ती न करण्याबाबत कळवण्यात येईल, असं सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं.


राज्यस्तरीय बँकर्स समितीची यासंदर्भात बैठक घेण्यात येईल. कुष्ठ रुग्ण त्यांच्या हातांच्या बोटांअभावी आधार क्रमांकापासून वंचित राहू नये, याकरता केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येईल, असंही बडोले यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या