Advertisement

आरेतील मेट्रो कारशरेडला विरोध करण्यासाठी आदित्य ठाकरे उतरले रस्त्यावर

आदित्य यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघासह मुंबईतील शिवसेना शाखांना भेट दिली.

आरेतील मेट्रो कारशरेडला विरोध करण्यासाठी आदित्य ठाकरे उतरले रस्त्यावर
(Image: Twitter/Aaditya Thackeray)
SHARES

मेट्रो-3 कारशेड डेपो आरेत स्थलांतरित करण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या निर्णयाविरोधात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे रविवारी रस्त्यावर उतरले.

उद्धव ठाकरे सरकारनं घेतलेले अनेक निर्णय शिंदे सरकारनं मागे घेतले. त्यापैकी एक निर्णय आरेत मेट्रो कारशेड उभारण्या संदर्भातील आहे. कारशेड आरेमध्ये उभारण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. पण शिंदे सरकारनं तो निर्णय मागे घेतला. यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

आदित्य म्हणाले की, एमव्हीए सरकारने कार डेपो कांजूरमार्ग येथे हलवला आहे आणि या जमिनीचा वापर चार मेट्रो रेल्वे मार्गांसाठी कंपोझिट डेपोसाठी केला जाऊ शकतो - III (कुलाबा ते SEEPZ), IV (वडाळा ते गायमुख), VI (स्वामी समर्थ नगर ते कांजूरमार्ग) आणि XIV (बदलापूर-कांजूरमार्ग). चार लाईनचे डेपो एकाच ठिकाणी करता आले असते. यामुळे ₹8,500 ते ₹10,000 कोटी रुपयांची बचत झाली असती.”

"आम्ही सत्तेत असताना आम्हाला ‘स्थगिती सरकार’ म्हणणारेच आज ‘स्थगिती सरकार’ झाले आहेत," असा टोला आदित्य ठाकरे यांनी रविवारी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष (भाजप) - शिवसेना सरकारच्या काळात, आरे जंगलात डेपो बांधण्यावरून सेनेचे मित्रपक्षांशी मतभेद होते.

मेट्रो-III मार्गाचे नियोजन "सदोष" असल्याचा आरोप आदित्यने केला. कारण त्यात स्थिरीकरणाची लाईन नाही. त्यामुळे काही बिघाड झाल्यास ट्रेन काढण्यासाठी संपूर्ण ३३ किमीचा मार्ग बंद करावा लागणार आहे.

युवासेना प्रमुख म्हणाले की, आरे जंगलात विकसित होत असलेल्या कारशेडचा मुद्दा केवळ झाडे तोडण्यापुरता मर्यादित नाही, तर हा परिसर बिबट्या आणि इतर प्राण्यांचा अधिवास आहे.

“एमव्हीए सरकार मुंबई समर्थक, महाराष्ट्र समर्थक होते. आम्ही शाश्वत विकासासाठी काम करत होतो,” आदित्य म्हणाले, त्यांनी आरे दूध वसाहतीची 808 एकर जागा राखीव जंगल म्हणून कशी राखून ठेवली.

एमव्हीएने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याच्या शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आदित्य यांनी आरोप केला, “...हे मुंबईविरोधी सरकार आहे असे वाटते. याचा महाराष्ट्रातील जनतेवर परिणाम होईल, असेही ते म्हणाले.

त्यानंतर आदित्य यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघासह मुंबईतील शिवसेना शाखांना भेट दिली. “आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी आमच्या पाठीत वार केले,” त्यांनी नव्याने निवडणुकांना सामोरे जाण्याचे धाडस करावे.

“ते (बंडखोर) म्हणतात की त्यांचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. जर त्यांचे आमच्यावर प्रेम असेल तर त्यांनी शिवसेनेत परतले पाहिजे, आम्ही त्यांना माफ करण्यास तयार आहोत, असे आदित्य म्हणाले.हेही वाचा

मनसेच्या आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देणे योग्य नाही : रामदास आठवले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा