Advertisement

‘आप’ लढवणार महापालिका निवडणूक

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (delhi vidhan sabha election 2020) जबरदस्त कामगिरी करत हॅटट्रीक साधणारा आम आदमी पक्ष (Aap) येऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक लढवणार आहे.

‘आप’ लढवणार महापालिका निवडणूक
SHARES

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (delhi vidhan sabha election 2020) जबरदस्त कामगिरी करत हॅटट्रीक साधणारा आम आदमी पक्ष (Aap) येऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक लढवणार आहे. एवढंच नाही, तर राज्यात पक्ष संघटना उभी करून सर्वच निवडणुका लढवण्याची तयारी करणार असल्याची माहिती पक्षाचे नेते आणि राज्याचे प्रभारी खासदार संजय सिंग यांनी दिली.

मुंबई प्रेस क्लबने आयोजित केलेल्या वार्तालपात सहभागी झालेल्या सिंग यांनी पक्षाच्या पुढील रणनितीवर भाष्य केलं. ते म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीत (delhi vidhan sabha election 2020) शाहीन बाग, कलम ३७०, राम मंदिर असे मुद्दे उपस्थित करत धर्माच्या आधारवर मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपने (bjp) केला होता. परंतु मतदारांनी दिल्लीत आरोग्य, शिक्षण, वाहतूक, पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या आम आदमी पार्टीलाच निवडून दिलं. देशभरातील मतदारांच्या मानसिकतेत असाच बदल झाल्यास भविष्यात आम आदमी पक्ष (aap) भाजपला पर्याय म्हणून उभा राहू शकेल.

एप्रिल महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेची (nmmc) निवडणूक होत आहे. ही निवडणूक आम आदमी पक्षातर्फे लढवण्यात येईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी दिली. त्यानंतर २ वर्षांनी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष ताकदीने उतरेल, असंही संजय सिंग यांनी जाहीर केलं. 

सध्या महाराष्ट्रात पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव असला पक्ष संघटना मजबून केल्यावर हा प्रश्न सुटेल. त्यामुळे पक्षाचा विस्तार करण्यावर पदाधिकाऱ्यांचा भर असल्याचं सिंग यांनी सांगितलं. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा