Advertisement

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - संजय राऊत

राज्य गुंडांच्या तावडीत, संजय राऊतांचा घणाघात

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - संजय राऊत
SHARES

माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी मुंबईमधील दहिसरमध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर महाराष्ट्र अवघा पुन्हा एकदा बंदुकीच्या गोळीने हादरून गेला आहे. (Abhishek Ghosalkar Firing Case Live Updates)

खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर ट्विट करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात.पक्षात प्रवेश देतात.गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे.अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय. आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत!फडणवीस राजीनामा द्या!


अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले होते, पण तीन गोळ्या शरीरात घुसल्याने अति रक्तस्त्राव होऊन त्यांची प्राणज्योत मालवली.

तत्पूर्वी, अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यापूर्वी माॅरिस नोरोन्हा आणि अभिषेक यांनी जवळपास 40 मिनिटे फेसबुक लाईव्ह केले होते. या दरम्यान शेवटच्या चार मिनिटांमध्ये माॅरिस नोरोन्हाने जवळून पाच राउंड फायरिंग केल्याने अभिषेक गोसाळकर गंभीर जखमी झाले. त्यांना अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा